adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

जनावरांची खरेदी-विक्री बंद आंदोलन मुळे सावदा येथील गुरांच्या बाजार मंदावला! "जवळपास दोनशे व्यापाऱ्यांनी फिरवली पाठ"

 जनावरांची खरेदी-विक्री बंद आंदोलन मुळे सावदा येथील गुरांच्या बाजार मंदावला! "जवळपास दोनशे व्यापाऱ्यांनी फिरवली पाठ"  रावेर प्रतिन...

 जनावरांची खरेदी-विक्री बंद आंदोलन मुळे सावदा येथील गुरांच्या बाजार मंदावला!

"जवळपास दोनशे व्यापाऱ्यांनी फिरवली पाठ" 


रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 जनावरांचे व्यापारी शेतकऱ्यांना कृषी उत्पन्न बाजाराची पावती असून त्यांना शेवटी आरोपींच्या पिंजऱ्यात उभे रहावे लागत आहे.तसेच काही तथाकथित गोरक्षक व त्यांच्याशी निगडित इतर लोकांच्या माध्यमातून सतत होत असलेले गैरवाजवी अन्यायामुळे जनावरांची खरेदी विक्री सह त्यांच्या वाहतुकीचा मुद्दा दिवसेंदिवस संवेदनशील स्वरुप धरत आहे.यामुळे अनेक प्रकारचे  वादविवाद,आर्थिक नुकसान, जिवितहानी सारख्या गंभीर गोष्टींना जनावरांचे व्यापारी व शेतकऱ्यांना समोर जावे लागते.परिणामी या गैरवाजवी प्रकारांना कंटाळून रावेर तालुक्यातील शेतकरी व व्यापाऱ्यांनी शासन तर्फे योग्य न्याय मिळेपर्यंत जनावरांची खरेदी-विक्री बंद बाबत  आंदोलन पुकारले आहे.

यामुळे दि.२० जुलै रोजी सावदा कृषी उत्पन्न उपबाजाराच्या आवारात रविवारी भरलेल्या गुरांच्या बाजाराकडे जवळपास दोनशे जनावराच्या व्यापाऱ्यांनी पाठ फिरवल्याने.याचे विपरीत परिणाम असे झाले की,यंदाच्या बाजारात फक्त ३० च्या आत दुधाळ म्हैशी शिवाय इतर गोवंश जातीच्या एकही जनावराची खरेदी-विक्री झालेली नाही.तरी या आधी सदर ठिकाणी भरलेल्या गुरांच्या बाजारांच्या तुलनेत सध्या या बाजारात जनावरांची खरेदी-विक्रीत कमालीची घट झाली आहे.आधी आपल्या बाजार समितीला विविध प्रकारचे जनावरांची खरेदी-विक्रीतुन दरवेळी ५५ ते ६० हजारा पर्यंत आर्थिक उत्पन्न प्राप्त होत होता.

मात्र आता व्यापाऱ्यांनी पुकारलेल्या बेमुदत आंदोलनामुळे जनावरांची खरेदी-विक्रीत कमालीची कमी झाली.यामुळे सावदा उपबाजार समितीचे आर्थिक उत्पन्न मिम्मे पेक्षा कमी झाली.अशी माहिती येथील उपबाजार समितीचे उपसचिव नितीन महाजन यांनी माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितली.

No comments