श्रावण मासानिमित्त त्रंबकेश्वर मंदिरामध्ये VIP दर्शन बंद प्रतिनिधी- जयवंत हागोटे त्रंबकेश्वर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) श्री क्षेत्र त्र...
श्रावण मासानिमित्त त्रंबकेश्वर मंदिरामध्ये VIP दर्शन बंद
प्रतिनिधी- जयवंत हागोटे त्रंबकेश्वर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
श्री क्षेत्र त्रंबकेश्वर अत्यंत महत्त्वाचे ज्योतिर्लिंग असल्यामुळे येथे श्रावण मासाच्या कालावधीत भाविकांची दर्शनासाठी प्रचंड गर्दी होत असते निरनिराळ्या माध्यमातून मंदिरात होणाऱ्या गर्दीमुळे प्रशासनावर होणारा ताण तसेच निर्माण होणाऱ्या अडचणी व प्रश्न याचा विचार करता विश्वस्त मंडळाने केलेल्या सूचनेनुसार श्री त्रंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट तर्फे श्रावण मासाच्या अनुषंगाने अति महत्त्वाच्या व्यक्तींसाठी केंद्रीय स्तरावरून राज्यस्तरावरून अथवा जिल्हाधिकारी यांच्या मार्फत प्राप्त होणाऱ्या राज्य शिष्टाचार संबंधित लेखी पत्रव्यवहार व्यतिरिक्त अन्य सर्व प्रकारचे व्हीआयपी पाच दर्शन दि.25 जुलै 2025 पासून दि.23 ऑगस्ट 2025 पर्यंत बंद करण्यात आलेले आहे.
श्री त्र्यंबकेश्वर मंदिर ट्रस्टने शुक्रवार दि. २५ पासून सुरू होणाऱ्या श्रावण महिन्यात भाविकांच्या सोयीसाठी विशेष दर्शन वेळा आणि नियोजन जाहीर केले आहे. विश्वस्त मंडळाच्या निर्णयानुसार शहरातील विविध भागांमध्ये हे नियोजन फलकाच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात आले आहे.
दररोज मंदिर पहाटे ५:०० ते रात्री ९:०० या वेळेत खुले राहणार
श्रावण महिन्यात दररोज मंदिर दर्शनासाठी पहाटे ५:०० ते रात्री ९:०० या वेळेत खुले राहणार असून, श्रावण सोमवारी ही वेळ पहाटे ४:०० पासून सुरू होईल. स्थानिक ग्रामस्थांना विशेष सवलती दिल्या असून, त्यांना सकाळी मंदिर उघडल्यापासून १०:०० वाजेपर्यंत व संध्याकाळी ६:०० ते ८:०० या वेळेत दर्शनाची संधी दिली जाईल. मात्र, स्थानिक असल्याचा पुरावा म्हणून ओळखपत्र बंधनकारक राहील. ग्रामस्थांसाठी प्रवेश उत्तर दरवाजातून (जाळीगेट) दिला जाईल.
धर्मदर्शन रांग पूर्व दरवाजातून व देणगी दर्शन रांग उत्तर दरवाजातून असेल. भाविकांसाठी गर्भगृह दर्शन बंद असणार आहे. प्रायोगिक तत्त्वावर ग्रामस्थांसाठी सात दिवस सकाळी ६:०० ते १०:०० या वेळेत पश्चिम द्वारातून प्रवेश मिळणार आहे.ट्रस्टने वातानुकूलित दर्शन रांगा, ज्येष्ठ नागरिकांसाठी बसण्याची सोय, स्तनदा मातांसाठी हिरकणी कक्ष, शुद्ध पिण्याचे पाणी व प्राथमिक आरोग्य सुविधा उपलब्ध केल्या आहेत.
No comments