ख्रिस्ती समाजाच्या वतीने पोलीस अधीक्षकांना निवेदन...नागापूर येथील ख्रिस्ती समाजाच्या दफनभूमीवर बेकायदेशीररित्या खरेदीखत बनवून अनधिकृत ताबा...
ख्रिस्ती समाजाच्या वतीने पोलीस अधीक्षकांना निवेदन...नागापूर येथील ख्रिस्ती समाजाच्या दफनभूमीवर बेकायदेशीररित्या खरेदीखत बनवून अनधिकृत ताबा घेण्याचा प्रयत्न...
सचिन मोकळं अहिल्यानगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अहिल्यानगर (दि.४): मौजे नागापूर येथील ख्रिस्ती समाजाच्या दफनभूमीवर अनधिकृतपणे खरेदीखत तयार करून ताबा मिळवण्याचा प्रयत्न होत असल्याच्या निषेधार्थ ख्रिस्ती समाजाच्या वतीने पोलीस उपअधीक्षक भारती यांना निवेदन देण्यात आले.
नागापूर येथील मिळकत क्रमांक 976 व 977 अ. ही जमीन मागील 70 वर्षांपासून ख्रिस्ती समाजाच्या दफनभूमी म्हणून वापरली जात आहे. या संपूर्ण जागेत आजपर्यंत दफनविधी झाले असून, जागा पूर्णतः वापरलेली आहे. नागापूर गावातील ग्रामस्थ आणि ख्रिस्ती समाज या दफनभूमीचा वापर करीत आले आहेत.
या पार्श्वभूमीवर काही व्यक्तींनी सदर जागेची बेकायदेशीर खरेदीखत तयार करून ताबा मिळवण्याचा प्रयत्न चालविला असून, याविरोधात ख्रिस्ती समाजाच्या शिष्टमंडळाने पोलीस उपाधीक्षक यांना निवेदन दिले. यामध्ये ख्रिस्ती समाजाचे विश्वास भाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सामाजिक न्याय विभागाचे सुरेश बनसोडे, आलेशा भाकरे, सोनाली भाकरे, दानिएल भाकरे, इंदुबाई भाकरे, कोमल भाकरे, वैशाली चक्रनारायण, योगेश भाकरे, मैनाबाई भाकरे, पुनम भाकरे, सुरेश भिंगारदिवे, अमोल भाकरे, शैलेश भाकरे, जॉन भाकरे, राजू भाकरे, मार्कस भिंगारदिवे, कमलाकर भाकरे, मच्छिंद्र भाकरे, पोपट भाकरे, त्रिभुवन दिलीप, प्रमोद भाकरे, साहेबराव भाकरे, अक्षय भाकरे, नितीन भाकरे, मनोहर भाकरे, सर्जेराव ठोंबे, अनिल ठोंबे, रमेश शिरसाठ, आशिष शिरसाठ, पीटर भाकरे, किरण पाटोळे, संजय चांदणे, दीपक घाटे, पुनम भाकरे, प्रवीण भाकरे, अमोल भाकरे, चार्लस भाकरे, प्रीती भाकरे, साक्षी भाकरे, ज्योती तिजोरे, अशोक भाकरे, जया भाकरे, अनिल भाकरे, दिलीप भाकरे, मनीषा भाकरे, आकाश भाकरे यांच्यासह अनेक समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.निवेदनात पुढे नमूद करण्यात आले आहे की,सदर दफनभूमी नागापूर नगर मनमाड मुख्य रस्त्यावर असून, गेल्या 50 ते 70 वर्षांपासून वडिलोपार्जित स्वरूपात तिचा वापर केला जात आहे. परंतु श्रीपाद शंकर छिंदम यांनी सदर जागा अनधिकृतपणे खरेदी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याठिकाणी महापालिकेने संरक्षणासाठी पत्र्याचे कंपाउंड उभारले आहे.
अलीकडील काही दिवसांपूर्वी छिंदम यांनी काही ग्रामस्थांना एमआयडीसी पोलीस ठाण्याजवळ बोलावून दमदाटी केली, तसेच शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे.ख्रिस्ती समाजाने या जागेची शतके जुनी परंपरा आणि काळजीपूर्वक देखभाल आजतागायत केली आहे. त्यामुळे बेकायदेशीरपणे खरेदीखत दाखवून दफनभूमीवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा समाजाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.

No comments