adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

धनाजी नाना महाविद्यालयात विद्यापीठस्तरीय एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन

 धनाजी नाना महाविद्यालयात विद्यापीठस्तरीय एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन  इदू पिंजारी फैजपूर  (संपादक -:- हेमकांत गायकवाड) फैजपूर येथील तापी परि...

 धनाजी नाना महाविद्यालयात विद्यापीठस्तरीय एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन 


इदू पिंजारी फैजपूर 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

फैजपूर येथील तापी परिसर विद्या मंडळ संचलित ध जरनाजी नाना महाविद्यालयाच्या इंग्रजी विभाग व इंग्लिश लैंग्वेज टीचर्स असोसिएशन ऑफ इंडिया (ELTAI) खान्देश चॅप्टर यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 23 ऑगस्ट 2025 शनिवारी इंग्लिश फॉर सक्सेस : कम्युनिकेशन स्किल अँड सॉफ्ट स्किल्स या विषयावर विद्यापीठस्तरीय एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यशाळेचे संयोजक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ राजेंद्र वाघुळदे असतील. तर समन्वयक म्हणून इंग्रजी विभाग प्रमुख कॅप्टन डॉ राजेंद्र राजपूत असून आयोजन सचिव प्रा डॉ शशिकला मगरे व प्रा डॉ नरेंद्र मुळे आहेत. सदर कार्यशाळेसाठी इंग्लिश लँग्वेज टीचर्स असोसिएशन ऑफ इंडिया चे व्हॉइस प्रेसिडेंट प्रा डॉ वैभव सबनीस धुळे, प्रा डॉ खलील अन्सारी धुळे , प्रा डॉ अजबराव इंगळे निजामपूर जैताणे, प्रा डॉ हेमंतकुमार पाटील म्हसदी, प्रा डॉ नितीन पाटील अमळनेर, प्रा डॉ दिनानाथ पाटील चोपडा, प्रा डॉ नितीन कापडिस हे मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यशाळेच्या आयोजनासाठी तापी परिसर विद्या मंडळाचे अध्यक्ष श्री शिरीषदादा चौधरी तथा सर्व व्यवस्थापन मंडळ पदाधिकारी यांनी शुभेच्छा दिल्या असून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ राजेंद्र वाघुळदे, सर्व उपप्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मार्गदर्शन आणि सहकार्य करीत आहेत. या कार्यशाळेचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन प्राचार्य डॉ राजेंद्र वाघुळदे यांनी केले आहे

No comments