adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

गणेशोत्सव व अन्य सण बघता शहरातील रस्त्यांची झालेली दयनीय अवस्था व ठिकठिकाणी रस्त्यांवर पडलेले खड्डे तात्काळ बुजविण्यात यावे -:-प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष अजय टप

गणेशोत्सव व अन्य सण बघता शहरातील रस्त्यांची झालेली दयनीय अवस्था व ठिकठिकाणी रस्त्यांवर पडलेले खड्डे तात्काळ बुजविण्यात यावे -:-प्रहार जनशक्त...

गणेशोत्सव व अन्य सण बघता शहरातील रस्त्यांची झालेली दयनीय अवस्था व ठिकठिकाणी रस्त्यांवर पडलेले खड्डे तात्काळ बुजविण्यात यावे -:-प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष अजय टप 


अमोल बावस्कार बुलढाणा

(संपादक -:- ‌हेमकांत गायकवाड)

आगामी काळातील गणेशोत्सव व अन्य सण बघता शहरातील रस्त्यांची झालेली दयनीय अवस्था व ठिकठिकाणी रस्त्यांवर पडलेले खड्डे तात्काळ बुजविण्यात यावे, अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष अजय टप यांनी आज २१ ऑगस्ट रोजी मुख्याधिकारी न.प. मलकापूर यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

दिलेल्या निवेदनात नमूद आहे की, येत्या काही दिवसात गणेशोत्सव, ऋषिपंचमी, ईद-ए-मिलाद व त्यानंतर नवरात्रोत्सवा सारखे सण आहेत. तर येत्या २७ ऑगस्टपासून गणेशोत्सवाला प्रारंभ होत आहे. या दरम्यान घरोघरी तसेच मंडळांमध्ये गणेशाच्या मुर्तीची स्थापना करण्यात येते. त्यामुळे गणेश मुर्ती वाजत-गाजत आगमन सोहळा व विसर्जन सोहळा हा संपन्न होतो. मलकापूर शहरातील रस्त्यांची अवस्था ही अत्यंत दयनीय अशी झाली असून रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्े पडलेले आहेत. अनेक गल्ली बोळातील रस्त्यांची चाळण झाली आहे. त्यामुळे गणेश मुर्ती आगमन व विसर्जन मिरवणुकी दरम्यान एखादवेळी मुर्तीची तुटफुट होवून विटंबना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.  असा प्रकार घडल्यास जनसामान्यांच्या भावनाही यामध्ये दुखावल्या जातील. तसेच मलकापूर शहरात गणेश विसर्जनाच्या दिवशी सार्वजनिक गणेश मंडळांची विसर्जन मिरवणूक सुध्दा मोठ्या प्रमाणात व उत्साहात निघत असते. यावेळी शहरातील मोठी मंडळे ह्या आपल्या गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी ट्रॅक्टरवर मोठमोठ्या मुर्त्या ठेवून मिरवणुकीत सहभागी होतात. मात्र शहरातील गणपती विसर्जन मिरवणुकीच्या मार्गाची अवस्था ही खराब झाली असल्याने त्या रस्त्यांवरून गणपती मंडळांचे मोठ्या गणेश मुर्त्यांसह जाणारे ट्रॅक्टर हे जातील कसे? असा प्रश्न उपस्थित होतो.

तेव्हा शहरातील अंतर्गत भागातील गल्लीबोळातील रस्त्यांची तातडीने डागडुजी करण्या बरोबरच -गणपती विसर्जन मार्गाच्या रस्त्यांचीही तातडीने दुरूस्ती करून खड्डे योग्य पध्दतीने बुजविण्यात यावे. अन्यथा प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन उभारण्यात येईल. याची जबाबदारी प्रशासनाची राहील याची नोंद घ्यावी, असेही निवेदनाच्या शेवटी अजय टप यांनी नमूद केले आहे.

No comments