adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

वेळोदे येथे आदिवासी दिनाचे बॅनरचे नुकसान

वेळोदे येथे आदिवासी दिनाचे बॅनरचे नुकसान   मच्छिंद्र कोळी गलंगी प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) गलंगी ता.चोपडा वेळोदे येथे आदिवासी पा...

वेळोदे येथे आदिवासी दिनाचे बॅनरचे नुकसान 



मच्छिंद्र कोळी गलंगी प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

गलंगी ता.चोपडा वेळोदे येथे आदिवासी पावरा समाजाचे शंभर ते दीडशे घरांची वस्ती आहे काल आदिवासी दिनानिमित्ताने आदिवासी तरुणांनी व सुप्रभात गृपच्या सहकार्यने बॅनर तयार करून वेळोदे येथे गाव दरवाज्याला संध्याकाळी सात वाजता बांधण्यात आले.

मात्र कोणी समाजकंटकाने ते बॅनर रात्री बारा वाजेनंतर ब्लेडने किंवा धारदार शस्त्राने फाडून ठेवले, सकाळी येणाऱ्या जाणाऱ्या ग्रामस्थानच्या लक्षात आल्यानंतर आदिवासी बांधवांनी बॅनर खाली उतरून गावातील वरिष्ठांच्या कानावर घातले गावातील ग्रामपंचायत सदस्य सरपंच व ज्येष्ठ नागरिकांनी आदिवासी पाड्यावर जाऊन बॅनर फाडल्या बाबत तीव्र निषेध व्यक्त केला कायदा सुव्यवस्था बिघडू नये म्हणून आदिवासी तरुणांना समज देण्यात आली व ग्रामीण पोलीस स्टेशनला तक्रार देण्याबाबत विचारविनिमय झाला. व त्या ठिकाणी आदिवासी दिनाचे औचित्य साधून धरती आबा बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी गावातील ग्रामपंचायत सदस्य संजय बोरसे ,ज्ञानेश्वर करणकाळे, क्रॉसिंग पावरा,व गावातील नागरिक अरुण सोनवणे, गोपीचंद सोनवणे, जयश चौधरी ,अशोक चौधरी, अशोक पवार ,धनराज पाटील, शैलेंद्र बोरसे, सुभाष नेरपगारे, प्रविण करनकाळे, कमलेश सैंदाणे, डोंगरसिंग पावरा,नाना पावरा, तसेच पाड्यातील आदिवासी तरुण उपस्थित होते.

No comments