आमदार चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत सावदा नगरपरिषद विविध योजनांचा घेतला आढावा रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी (संपादक -:- हेमकांत गायकवा...
आमदार चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत सावदा नगरपरिषद विविध योजनांचा घेतला आढावा
रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
मुक्तानगर विधानसभा क्षेत्राचे आमदार मा चंद्रकांत भाऊ पाटील यांनी सावदा नगरपरिषद मार्फत शहरात सुरू असलेल्या विविध विकास कामांचा आढावा घेणे करिता भेट दिली. या प्रसंगी सर्वप्रथम सावदा नगर परिषद चे मुख्याधिकारी मा भूषण वर्मा यांनी आमदार चंद्रकांत पाटील यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तसेच सावदा पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांचे सुद्धा स्वागत करण्यात आले.सर्वप्रथम आमदार महोदयांनी सावदा शहरात सुरू असलेल्या अमृत २.० योजनेचा आढावा घेतला मुख्याधिकारी यांनी सदरहून योजनेचे काम ४०% पूर्णत्वास आले आहे व उर्वरित काम हे पावसाळा सुरू असल्याने संथगतीने होत असल्यामुळे सांगितले तसेच पावसाळा संपला की तत्काळ काम मार्गी लावण्याचे आमदार साहेबांना सांगण्यात आले. सदरील योजनेच्या एकूण खर्चापैकी १०% रक्कम ही नगरपरिषदेने
जमा करायचे असल्याने व सध्याचे नगर परिषदेचे आर्थिक स्थिती बघता रक्कम जमा शक्य करणे होत नसल्याने मुद्दा माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी यांनी उपस्थित केल्याने त्या रकमेबाबत सुद्धा मदत करण्याचे आदरणीय आमदार महोदयांनी सांगितले. नगरपालिकेचे माजी गटनेते श्री फिरोज पठाण व शिवसेना शहर प्रमुख सुरज भाऊ परदेशी यांनी ३. सुद्धा योजनेला जास्तीत जास्त मदत करण्याचे आमदार साहेबांना विनंती आमदार साहेबांनी संबंधित योजना तत्काळ पूर्ण करण्याचे नगरपालिका प्रशासन व संबंधित मक्तेदार यांना सुचित केले.
स्वच्छ भारत अभियान व माझी वसुंधरा अभियानांतर्गत सावदा शहरा तील विविध शाळांमध्ये चित्रकला स्पर्धा व निबंध लेखन स्पर्धा घेण्यात आली होती या स्पर्धेतील प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थ्यांना आमदार साहेबांच्या हस्ते गुलाब पुष्प प्रमाणपत्र व मेडल देऊन सत्कार करण्यात आला. चित्रकला स्पर्धा
योगेश दिलीप चौधरी २. प्रतीक संतोष साळी वेदिका राहल प्रतीक्षा प्रकाश ४. निबंध पाटील जोशी स्पर्धा २. ३. ४. धीरज मधुकर पाटील लीना किरण चौधरी विजया खुशाल चौधरी राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत श्लोक महिला बचत गटास ८००००० रु धनादेशाचे वितरण मा. आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांचे हस्ते करण्यात आले. सदरील बैठकीस मा. नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी, मा. उपनगराध्यक्ष शामभाऊ अकोले, मा. गटनेते फिरोज खान शिवसेना शहर प्रमुख सुरज भाऊ परदेशी, माजी उपनगराध्यक्ष चंद्रशेखर पाटील, जितेंद्र (जे. के भारंबे, सचिन बन्हाटे, मनिष भंगाळे, गणेश माळी, निलेश खाचणे व शहरातील प्रतिष्टीत नागरिक तसेच नगरपालिका अधिकारी कर्मचारी वृंद उपस्तित होते
No comments