मुलानी आज शाळेत बनविल्या शाळू मातीच्या श्रीगणेशमूर्ती... मुक्ताईनगर प्रतिनिधी सतीश गायकवाड (संपादक -:- हेमकांत गायकवाड) जे. ई. स्...
मुलानी आज शाळेत बनविल्या शाळू मातीच्या श्रीगणेशमूर्ती...
मुक्ताईनगर प्रतिनिधी सतीश गायकवाड
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
जे. ई. स्कूल आणि ज्यु कॉलेज मुक्ताईनगर येथे गणेश मूर्ती बनवण्याची कार्यशाळा आज शनिवार रोजी आयोजित करण्यात येऊन सदर कार्यशाळेत मोठ्या संख्येने विद्यार्थी व शिक्षक सहभागी झालेत. पर्यावरण पूरक शाळू मातीपासून श्री गणेश मूर्ती बनवण्याचा आनंद घेतला. कार्यशाळेसाठी मार्गदर्शक म्हणून उपस्थित असलेले माजी विद्यार्थी, मूर्तिकार शिवम अनुप सुतार यांनी शाळू मातीपासून मूर्ती कशी
साकारावी याचे विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना प्रत्यक्ष मूर्ती बनविण्याची कृती दाखवून मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी ही मोठ्या संख्येने सहभागी होत कार्यशाळेत मुर्त्या बनवून प्रत्यक्ष अनुभव घेतला.कार्यशाळेत बनविलेल्या श्रीगणेश मूर्तीचीच प्रतिस्थापना गणेशचतुर्थी निमित्त केली जाणारआहे. मुलानी साकारलेल्या छान अशा मूर्ती बघून आणि या कार्यशाळेनिमित्त पालकांनी कौतुकाचा वर्षाव केला.या कार्यशाळेसाठी उपस्थित माजी विद्यार्थी मूर्तिकार यांचा परिचय एस आर ठाकूर यांनी करून दिला. संपूर्ण कार्यशाळेचे आयोजन आणि कार्यक्रमाचे नियोजन चित्रकला शिक्षक श्रीमती अर्चना भोळे मॅडम,हेमंतकुमार बाऊस्कर सर यांनी केले.कार्यशाळे साठी परिश्रम घेऊन विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले. कार्यक्रम प्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य व्ही एम चौधरी सर, उपमुख्याध्यापक व्ही के शिर्के मॅडम, पर्यवेक्षक व्ही डी बऱ्हाटे सर,के आर कवळे सर तथा सर्व शिक्षक- शिक्षकेतर बंधू भगिनी उपस्थित होते.

No comments