adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

वरणगाव येथे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद व भटके-विमुक्त जमातीची संयुक्त बैठक संपन्न.

 वरणगाव येथे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद व भटके-विमुक्त जमातीची संयुक्त बैठक संपन्न.  मुक्ताईनगर प्रतिनिधी सतीश गायकवाड (संपादक -:- ...

 वरणगाव येथे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद व भटके-विमुक्त जमातीची संयुक्त बैठक संपन्न. 


मुक्ताईनगर प्रतिनिधी सतीश गायकवाड

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद व भटके-विमुक्त जमातींची संयुक्त बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीत समाजातील शोषित, वंचित व पीडित घटकांना न्याय मिळावा यासाठी सर्वंकष चर्चा करण्यात आली.

बैठकीत भटक्या समाजासाठी शासनाकडून उपलब्ध असलेल्या सवलती व योजनांचा लाभ प्रत्येक पात्र घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करण्याचे ठरविण्यात आले. तसेच एकमताने निर्णय घेण्यात आला की ३१ ऑगस्ट हा दिवस ‘भटके विमुक्त दिवस’ म्हणून वरणगाव येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येईल.या वेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्र येऊन काम करण्याचा संकल्प व्यक्त केला. शोषित, वंचित व पीडित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी ठोस पावले उचलण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला.

बैठकीस अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद जिल्हा विभाग संघटक सविता माळी, समता परिषद शहराध्यक्ष गणेश माळी, तालुकाध्यक्ष सोनिया गायकवाड, शहराध्यक्ष लक्ष्मी बैरागी, तालुका उपाध्यक्ष मनीषा पाटील, भारती कापसे, सामाजिक कार्यकर्त्या उर्मिला चौधरी, संध्या पवार, सरुबाई वाघमारे, नीलिमा झोपे, सुवर्णा धनगर, आशा चौधरी, ज्योती गुरव, निर्मला जवरे, रवींद्र गायकवाड, शामराव धनगर, रवी माळी, भगवान वंजारी, रफिक पठाण, अरुण धनगर, संदीप कापसे, संतोष नारखेडे, रवींद्र पालीमकर व सचिन पालीमकर आदींची उपस्थिती लाभली. बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार ३१ ऑगस्टला ‘भटके विमुक्त दिवस’ वरणगाव येथे साजरा करून समाजाच्या हक्काच्या मागण्या प्रभावीपणे मांडण्यात येणार आहेत.

No comments