अवैध गांजा वाहतुक करणारे दोन इसम स्थानिक गुन्हे शाखेकडुन जेलबंद... चोपडा प्रतिनिधी (संपादक :- हेमकांत गायकवाड) स्थानिक गुन्हे शाखेच्या पोल...
अवैध गांजा वाहतुक करणारे दोन इसम स्थानिक गुन्हे शाखेकडुन जेलबंद...
चोपडा प्रतिनिधी
(संपादक :- हेमकांत गायकवाड)
स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकास गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, शिरपुर ते चोपडा मार्गे ता. चोपडा येथे दोन इसम मोटार सायकलवर गांजा अंमलीपदार्थचे वाहतुक करुन घेवुन जाणार असलेबाबत खात्रीशीर बातमी मिळाली त्यावरुन
मिळालेल्या बातमी प्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी तसेच अंमलदार तसेच चोपडा ग्रामीण पो.स्टे. पो.नि.श्री महेश टाक व अमंलदार यांनी एकत्रीत येवून शिरपुर ते चोपडा जाण-या रोडवर काजीपुरा फाट्या जवळ सापळा लावून थांबले असतांना मिळालेल्या बातमी प्रमाणे शिरपुर कडुन चोपड्या कडे येणा-या मोटार सायकल थांबवून मोटार सायकल वरील दोन्ही इसमास ताब्यात घेवून त्यांना त्याचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्याचे नाव अनुक्रमे १) आरीफ शेख सलीम वय-४४ वर्षे रा-माहेजी ता-पाचोरा जि-जळगांव २) शशिकांत रघुनाथ जाधव वय-४२ वर्षे रा-माहेजी ता-पाचोरा जि-जळगांव असे सांगीतलल्याने त्यांना ताब्यात घेवून त्याचे कडून १,१८,१८४/- रु. कि.चा ०५ किलो ३७२ ग्रॅम वजनाचा गांजा, होन्डा शाईन कंपणीची मोटार सायकल क्रमांक MH१९-CL-६०८४ व २ मोबाईल असे एकुण १,७८,१८४/- रु कि.चा मुद्देमाल हस्तगत करून त्यांचे विरुध्द चोपडा ग्रामीण पो.स्टे. ला CCTNS NO २२१/२०२५ NDPS अॅक्ट २० (ब), २२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई ही मा.डॉ.श्री महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक, जळगाव, मा. श्रीमती कविता नेरकर अपर पोलीस अधिक्षक, चाळीसगांव, मा.पो.उप. अधिक्षक. विनायक कोते, मा.श्री. संदीप पाटील पोलीस निरीक्षक, स्थागुशा जळगाव, मा.श्री महेश टाक चोपडा ग्रामिण पो.स्टे, यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.
सदरची कारवाई पोउपनिरी श्री जितेंद्र वल्टे, पोह. विलेश सोनवणे, पोह. विष्णु बि-हाडे, पोह. दिपक माळी, पोह. रविंद्र पाटील, पोकॉ. रावसाहेब पाटील सर्व नेम. स्थागुशा जळगाव तसेच चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनचे, सफौ. राजु महाजन, पो.अ. विनोद पवार, किरण पारधी, चेतन महाजन, रविंद्र पाटील, विशाल जाधव अशांनी केली आहे.

No comments