adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

यावल पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांची बदली करण्यात यावी: शिवसेना / पवार गटाची मागणी

  यावल पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांची बदली करण्यात यावी: शिवसेना / पवार गटाची मागणी  भरत कोळी यावल ता. प्रतिनिधी  (संपादक -:- हेमकां...

 यावल पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांची बदली करण्यात यावी: शिवसेना / पवार गटाची मागणी 


भरत कोळी यावल ता. प्रतिनिधी 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)     

  यावल पंचायत समितीच्या कार्यरत असलेल्या पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी डॉ मंजुश्री गायकवाड यांचा नागरिकांशी व विविध पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना मिळत असलेल्या असभ्य वागणुकी संदर्भात शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा उपसंघटक नितिन सोनार व यावल तालुका प्रमुख राजु काटोके राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे युवकचे जिल्हा उपाध्यक्ष जुगल पाटील व आकाश चोपडे यांच्यासह त्यांच्या पक्षातील पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने यावल पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी बा. का. पवार यांची भेट घेवुन, गटविकास अधिकारी यांच्या प्रशासकीय कामकाज व त्यांची सर्वसामान्य नागरीकांना व पत्रकार यांना देखील मिळत असलेल्या अशोभनिय वागणुक व दडपशाही, मनमानी कारभाराला घेवुन अनेक तक्रारी असुन,अशा प्रकारे प्रशासकीय सेवेत बेजबाबदारपणे वागणाऱ्या अधिकाऱ्यांची यावल पंचायत समितीतुन तात्काळ बदली करण्यात यावी तसे न झाल्यास शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीने आंदोलन छेडले जाईल असे ही त्यांनी सहाय्यक गटविकास अधिकारी बा. का. पवार यांच्याशी बोलतांना सांगीतले आहे असुन, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जळगाव  यांनी या संदर्भात गांर्भीयाने लक्ष घालुन गटविकास अधिकारी यांची बदली करावी अशी मागणी केली असून,सहाय्यक गटविकास अधिकारी बा.का.पवार यांची भेट शिष्ठ मंडळात नितिन सोनार,जुगल पाटील,राजु काटोके,आकाश चोपड़े,सागर सपकाळे,राजु सपकाळे,किरण महाजन,मनोहर पाटील व आदि पदाधिकारी उपस्थित होते.                                  दरम्यान आपल्या भावना वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पहोवण्याचा आपण प्रयत्न करू असे आश्वासन पवार यांनी शिष्ठ मंडळाशी बोलताना दिले .

 शिवसेना गट व अजित पवार गट या संयुक्त कार्यकर्त्यांनी जे निवेदन दिलेले आहेत ते यावल तालुक्यातील ग्रामस्थांच्या अडीअडचणी पाहून तसेच दोन  वर्षांमध्ये आजपर्यंत कोणतीही ग्रामस्थांची तक्रार निवारण झालेली नसून या अनुषंगाने यावल तालुक्यामध्ये गटविकास अधिकारी हे जे पद आहे हे पद फक्त नावालाच आहे का? अशा अधिकाऱ्याची माननीय चोपडा /रावेर /यावल /तालुक्याचे दोघ आमदारांनी जातीने लक्ष देऊन अशा अधिकाऱ्यांची तात्काळ बदली करून यावल तालुक्याला नवीन गट विकास अधिकारीची नेमणूक करण्यात अशी मागणी यावल तालुक्यातील महिला ग्रामस्थ हे करीत आहे

No comments