मधु ताराच्या वतीने पुण्यातील दापोडी भागातील जयभीम नगर येथे दिव्यांगाच्या घरी जाऊन मोफत वॉकर भेट. पुणे प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवा...
मधु ताराच्या वतीने पुण्यातील दापोडी भागातील जयभीम नगर येथे दिव्यांगाच्या घरी जाऊन मोफत वॉकर भेट.
पुणे प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
दिनांक 18 ऑगस्ट 2025 रोजी मधु तारा दिव्यांग सेवा सोशल फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष श्री नितीनजी शिंदे यांच्या वतीने पुण्यातील दापोडी भागातील जयभीम नगर येथील 59 टक्के पायात दिव्यांग असलेल्या सुनीता शंकर काची यांना त्यांचा सांभाळ करीत असलेल्या आणि सुनीता हिच्या साठी वॉकर साठी विनंती करणाऱ्या 60 टक्के दिव्यांग अल्प दृष्टी बाधित शांताबाई रिठे यांच्या घरी जाऊन मोफत वॉकर भेट देण्यात आली.
ही वॉकर आणि 500 रु ची आर्थिक मदत आपण ही समाजाचे देणे लागतो या भावनेने माणसातील देव पुण्यातील चर्होली येथील श्री अशोकजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून शांताबाई रिठे यांना मधु ताराच्या कार्याला पाहून देण्यात आली या पवित्र क्षणी श्री अशोकजी शिंदे यांच्या सहचारिणी सौ शिंदे ताई याही उपस्थित होत्या.
या प्रसंगी मधु तारा प्रमुखांचे गुरुवर्य मुंबईचे आदरणीय श्री धनंजय पवार साहेब.मधु ताराचे दिव्यांग राज्याध्यक्षा निर्मलाताई चौधरी तसेच पिंपरी चिंचवडचे वासंतीताई जाधव यांची फोन वरून रिठे ताई यांना मधु तारा तुमच्या सोबत आहे आणि लवकरच रिठे ताई आणि सुनीता काची यांना मधु ताराच्या वतीने संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी चर्चा करण्यात आली. या वेळी ओळख क्षण भराची पण कार्य आयुष्यभराच्या समाधानाची असे म्हणत श्री अशोक शिंदे साहेबांचे आभार मधु तारा प्रमुख श्री नितीनजी शिंदे यांनी व्यक्त केले.

No comments