फैजपूरच्या श्री लक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था तर्फे गरीब निराधार विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप इदू पिंजारी फैजपूर (संपादक -:- ह...
फैजपूरच्या श्री लक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था तर्फे गरीब निराधार विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप
इदू पिंजारी फैजपूर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
फैजपूर येथील कुसुमताई माध्यमिक विद्यालयात श्री लक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था तर्फे गरीब विद्यार्थ्यांसाठी मोफत शालेय साहित्य वाटप करण्यात आले हा कार्यक्रम शाळेचे उपाध्यक्ष पंडित कोल्हे यांचे हस्ते पार पडला यावेळी मुख्याध्यापक बोन्दे सर महाजन सर एल जे बोन्दे व शिक्षक वृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते गरीब निराधार विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण घेत असताना कोणतीही अडचण येऊ देणार नाही संस्था सदैव अश्या विद्यार्थ्यांचे पाठीशी असल्याचे लक्षमी पतसंस्था चेअरमन नरेंद्र नारखेडे यांनी सांगितले यावेळी दप्तर वह्या कंपास पेटी वाटप करण्यात आले दरवर्षी हा उपक्रम राबविण्यात येत असून यासाठी व्हा चेअरमन मनोजकुमार पाटील संचालक अनिल नारखेडे निळकंठ सराफ प्रा रविंद्र चौधरी डा गणेश चौधरी सुरेश परदेशी अप्पा चौधरी विजय कुमार परदेशी रेवती पाटील लतिका बोन्दे व्यवस्था पक जयश्री चौधरी यांचे सहकार्य लाभले आहे.

No comments