आरटीओ कडून होणारी पिळवणूक थांबवावी म्हणून तहसीलदारांची भेट चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) चोपडा तालुका हा आदिवासी बहूल तालुक...
आरटीओ कडून होणारी पिळवणूक थांबवावी म्हणून तहसीलदारांची भेट
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
चोपडा तालुका हा आदिवासी बहूल तालुका असून शेजारीच मध्यप्रदेशाची सीमा आहे त्यामुळे मध्यप्रदेश व महाराष्ट्रातील जनतेला व्यापारासाठी चोपडा शहर हे मध्यभागी व जवळ असल्याने नागरिकांना सोयीस्कर होते.
पण येणाऱ्या जाणाऱ्या गोरगरीब जनतेकडून व हेवी वाहनांना थांबवुन आरटीओ पोलिसांची गाडी नेहमी रस्त्यावर दिसते.मोठ्या ट्रक्स खाजगी छोट्या मोठ्या गाड्या नेहमी चेकिंग करण्याच्या बहाण्याने आरटीओ पोलीस पथक दिसते,विनाकारण गोरगरीब जनतेची पिळवणूक करण्याचे प्रकार पोलिसांचे सुरू आहेत,म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी उपजिल्हाध्यक्ष अमृतराज सचदेव यांनी तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांना भेटून सविस्तर चर्चा करून असे प्रकार थांबवावे म्हणून सांगितले. त्यावेळी राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष सनी सचदेव,व पत्रकार मिलिंद सोनवणे उपस्थित होते.
No comments