adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

शनीसेवा सोशल फाउंडेशनची सदगुरु गंगागिरी महाराजांच्या सप्ताहात सेवा

 शनीसेवा सोशल फाउंडेशनची सदगुरु गंगागिरी महाराजांच्या सप्ताहात सेवा  श्रीरामपूर / प्रतिनिधी: (संपादक -:- हेमकांत गायकवाड) योगीराज सदगुरु गंग...

 शनीसेवा सोशल फाउंडेशनची सदगुरु गंगागिरी महाराजांच्या सप्ताहात सेवा 


श्रीरामपूर / प्रतिनिधी:

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

योगीराज सदगुरु गंगागिरी महाराजांचा १७८ वा हरिनाम सप्ताह शनी देवगांव ता. वैजापूर जि. छत्रपती संभाजीनगर येथे सुरू आहे. आणि तिथे महाराष्ट्र शासन नोंदणीकृत शनीसेवा सोशल फाउंडेशन या संस्थेला एक दिवसाची सेवा करण्याची संधी प्रा. मोहन वामने सर यांनी दिली होती. शनीसेवा सोशल फाउंडेशन ने आतापर्यंत महाराष्ट्रातील कित्येक देवस्थान मधे स्वयंसेवक म्हणून उत्कृष्ट अशी कामगिरी केली आहेच परंतु अलीकडेच आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूर येथे जाण्यासाठी निघालेल्या एकुण ४८ दिंड्याना डॉ. सुधाकर निकाळजे यांच्या मार्गदर्शनाखाली मोफत वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिली होती. त्यातच सदगुरु योगीराज गंगागिरी महाराजांच्या सप्ताहात सेवा करण्याची संधी मिळाली म्हणून फाऊंडेशन चे सदस्य अगदी आनंदाने सहभागी झाले होते. यामध्ये सर्वश्री बाळासाहेब वर्मा, डॉ. सुधाकर निकाळजे, बंडुकाका दहातोंडे, संभाजी दहातोंडे, बाबासाहेब भालके, बाळासाहेब जावळे, चंद्रकांत जावळे, विठ्ठल दहातोंडे, सोमनाथ दहातोंडे, निरज मनोचा, लक्ष्मण दहातोंडे, सोमनाथ जावळे, निकेतन जावळे, अरुण जावळे, शुभम अभंग, पांडुरंग जावळे, भारत धुमाळ, बाबासाहेब जावळे, सुनिल अडसुरे, संजय वैरागर,अशोक दहातोंडे, बंडू अडसुरे, सतिश शिंदे, शिवाजी शेळके, शशिकांत कर्डिले,नंदकुमार दहातोंडे, भाऊसाहेब दहातोंडे, संतोष तुपे तसेच चांदा ता. नेवासा या गावातील महिलां भगिनीं प्रथमच सेवेसाठी सहभागी झाल्या होत्या त्यामध्ये चांदा ग्रामपंचायतीच्या विद्यमान उपसरपंच सौ. संगीताताई दिवटे,प्राथमिक शिक्षका शांता मरकड-दहातोंडे मॅडम, मंगल येळवंडे, मनिषा पासलकर, मिराताई दहातोंडे, राणी दहातोंडे, सुजाता दहातोंडे, मनिषा बोरुडे, मनिषा थिटे आदी सदस्यांनी सहभाग घेतला होता, शनीसेवा सोशल फाउंडेशन चे अध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ते तथा ज्येष्ठ पत्रकार कमलेश शेवाळे (देवा) यांनी सांगितले की, या निशुल्क सेवेतून जो आनंद मिळतो तो जगात कुठेच मिळणार नाही, यासाठी सर्व सहयोगींचे सहकार्य लाभले याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.


वृत्त विशेष सहयोग

ज्येष्ठ पत्रकार कमलेश

 शेवाळे (देवा) - चांदा 


वृत्त प्रसिद्धी सहयोग

समता मीडिया सर्व्हिसेस

 श्रीरामपूर - 9561174111

No comments