adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

पारंपरिक वाद्य वाजवून गुण्यागोविंदाने सर्वसमावेशक गणेशोत्सव साजरा करावा - सपोनि विशाल पाटील सावखेडा येथे शांतता समितीच्या बैठकीत केले आवाहन

पारंपरिक वाद्य वाजवून गुण्यागोविंदाने सर्वसमावेशक गणेशोत्सव साजरा करावा - सपोनि विशाल पाटील  सावखेडा येथे शांतता समितीच्या बैठकीत केले आवाहन...

पारंपरिक वाद्य वाजवून गुण्यागोविंदाने सर्वसमावेशक गणेशोत्सव साजरा करावा - सपोनि विशाल पाटील 

सावखेडा येथे शांतता समितीच्या बैठकीत केले आवाहन  


रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

रावेर तालुक्यातील सावखेडा येथे  गणेशोत्सवानिमित्त गणेश मंडळांची शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले  सावखेडा बुद्रुक येथील ग्रामपंचायत कार्यालयात सावदा पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलिस निरीक्षक विशाल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली गणेश मंडळाची बैठक संपन्न झाली.येणाऱ्या आगामी गणेशोस्तवाच्या पार्श्वभुमिवर गणेश मंडळांना मार्गदर्शन केले.यावेळी सहाय्यक पोलिस निरीक्षक  विशाल पाटील यांनी गणपती मंडळ पदाधिकाऱ्यांना व श्री गणेश भक्तांनी गणपती मूर्ती कमीत कमी उंचीची घेऊन मूर्तीची योग्य ती काळजी घेऊन पारंपरिक वाद्य वाजवून अवाजवी खर्च टाळावा आणि सर्वसमावेशक गणेशोत्सव साजरा करावा व इतर समाजाच्या भावना दुखावल्या जाणार नाही, याची काळजी घेऊन शांततेत मिरवणूक काढण्याच्या सूचना दिल्या.

     यावेळी पोलिस हवालदार मेहेरबान तडवी, जयराम खोडपे, पोलिस हवालदार गोपनीय शाखेचे पो कॉ.मयुर पाटील, पो कॉ.राहुल येवले,पो हे कॉ रामदास बोदडे, पोलिस पाटील गणेश पाटील, सावखेडा खुर्द पोलीस पाटील गणेश मंडळाचे अध्यक्ष ,उपाध्यक्ष व कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments