अंकलेश्वर ते बुऱ्हाणपूर महामार्ग हा यावल ते फैजपूर पर्यत दुरूस्ती करण्याची मागणी भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) अ...
अंकलेश्वर ते बुऱ्हाणपूर महामार्ग हा यावल ते फैजपूर पर्यत दुरूस्ती करण्याची मागणी
भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अंकलेश्वर ते बुऱ्हाणपूर हा महामार्ग यावल ते फैजपूर पर्यंत अतिशय खराब झाला असून सदर रस्त्याचे सध्या चालू असलेले देखभाल दुरूस्ती काम तात्काळ सुरू करण्यात यावे. याबाबत ठेकेदाराला त्वरित आदेश पारीत करावे कारण येणाऱ्या गणेशोत्सवासाठी हा महामार्ग त्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे. कारण रावेर व बुऱ्हाणपूर या ठिकाणाहून मोठमोठे गणपती आणले जातात व गणेश भक्तांना त्यासाठी मोठी कसरत करावी लागते व रस्त्यात अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत व सदरील रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक असून दुचाकीस्वारांना आपला जीव मुठीत धरून वाहन चालवावे लागत आहे. तरी पावसाळ्यात या मोठ्या प्रमाणात पडलेल्या खड्यामुळे अपघात होऊन निष्पाप नागरिकांना आपला जिव गमवावा लागू शकतो. यावल चोपडा हा रस्ता जसा दुरुस्ती करण्यात आला तसाच यावल फैजपुर रस्ता दुरुस्ती करावा अशी मागणी पंचक्रोशीतील ग्रामस्थ व वाहनधारक करीत आहेत

No comments