चोपडा तालुका माध्य शिक्षक व शिक्षकेतर नोकरांची सह.पतपेढीच्या अध्यक्षपदी प्रदिप नायदे तर उपाध्यक्षपदी संजय महाजन चोपडा (प्रतिनिधी) (संपा...
चोपडा तालुका माध्य शिक्षक व शिक्षकेतर नोकरांची सह.पतपेढीच्या अध्यक्षपदी प्रदिप नायदे तर उपाध्यक्षपदी संजय महाजन
चोपडा (प्रतिनिधी)
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
चोपडा -:- येथील चोपडा तालुका माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर नोकरांची सह पतपेढीचे अध्यक्ष आर एस पाटील व उपाध्यक्ष गुणवंत वाघ यांनी मौखिक करारानुसार ठरल्याप्रमाणे राजीनामा दिल्याने रिक्त पदासाठी निवडणुक कार्यक्रमानुसार अध्यक्षपदासाठी प्रदिप काशिनाथ नायदे ( पी के नायदे वर्डी ) व उपाध्यक्षपदासाठी एस. पी महाजन ( धानोरा) यांचे एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.निवडणुक निर्णय अधिकारी श्रीमती मानसी धावरे सहायक निबंधक सहकारी संस्था चोपडा व देवानंद पुरोहित यांनी कामकाज पाहिले तर त्यांना पतपेढीचे मुख्य लिपिक योगेश पाटील,व विजय पाटील यांनी सहकार्य केले.यावेळी संस्थेचे सदस्य दिनेश बाविस्कर, कैलास चौधरी, सुभाष पाटील, श्रीमती सुनंदा रघुनाथ शिंदे, श्रीमती वंदना सरदार पावरा उपस्थित होते.नवनियुक्त अध्यक्ष प्रदिप नायदे व उपाध्यक्ष संजय महाजन यांचा संस्थेचे मार्गदर्शक आर एच बाविस्कर,भरत चव्हाण, राजेंद्र साठे,व्ही पी चौधरी,ए सी चौधरी यांनी अभिनंदन करुन भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

No comments