धरणगाव तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत आनंद पाटील ठरला अव्वल जिल्हास्तरावर झाली निवड, आदर्श विद्यालयाचा खेळाडूचा झाला गौरव विकास पाटील धरणगाव...
धरणगाव तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत आनंद पाटील ठरला अव्वल
जिल्हास्तरावर झाली निवड, आदर्श विद्यालयाचा खेळाडूचा झाला गौरव
विकास पाटील धरणगाव
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
धरणगाव : दि.18/08/2025 तालुका क्रीडा संकुल धरणगाव येथे संपन्न झालेल्या धरणगाव तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत 19 वर्षे वयोगटातील आनंद सुभाष पाटील 65 किलो वजन गटात कुस्ती जिंकत धरणगाव तालुक्यात पहिला क्रमांक पटकावला.तसेच 19 वर्ष वयोगटातील या विद्यार्थ्यांनी स्पर्धेत आपले स्थान कायम राखुन या विद्यार्थ्यांची निवड जिल्हा स्तरावर झाली आहे.तरी या विजयी विद्यार्थ्यांचे आदर्श माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे अध्यक्ष सी.के.पाटील,सचिव सुरेखा.एस.पाटील, विद्यालयाचे संचालक मच्छिंद्र पाटील,अश्विन पाटील,मुख्याध्यापक संदीपकुमार सोनवणे यांनी कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.तसेच या विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक फिलिप गावीत यांनी मार्गदर्शन केले.तसेच विद्यालयाचे सर्व शिक्षक बंधु -भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विजयी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

No comments