भाषा समजून घेण्यासाठी 'गेमिफिशिंग' चा सदुपयोग या विषयावर यावल महाविद्यालयात व्याख्यान संपन्न. भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी (संपादक -...
भाषा समजून घेण्यासाठी 'गेमिफिशिंग' चा सदुपयोग या विषयावर यावल महाविद्यालयात व्याख्यान संपन्न.
भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सह समाजाचे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय यावल येथे प्राध्यापक प्रबोधिनी अंतर्गत इंग्रजी विभागाचे प्रा. मृणाल धायडे यांच्या व्याख्यानाने पहिले पुष्प वाहिले. या प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. एम.डी. खैरनार अध्यक्ष म्हणून तर उपप्राचार्य डॉ. हेमंत जी. भंगाळे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
बहुदा ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषा समजून घेण्यासाठी जास्त अडचणी येतात अशावेळी त्यांच्यातील भीती दुर करण्यासाठी गुगल वर्ड कोच, डुलिंगो , कहुत यासारख्या ॲप्सच्या साहाय्याने भाषा समजून घेण्यासाठी चांगला उपयोग होऊ शकतो याची संशोधनात्मक पद्धतीने मांडणी प्रा.धायडे यांनी आपल्या अभ्यासपूर्ण विवेचनात केली. महाविद्यालयातील प्राध्यापक उच्चविद्याविभूषित असतो त्याला आपल्या विषयाचे सखोल ज्ञान असते आणि तेच ज्ञान आपल्या इतर सहकारी प्राध्यापक बांधवांना मिळून त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा याकरिता अशा व्याख्यानाचे आयोजन होणे गरजेचे आहे असे सांगून उपप्राचार्य प्रा. एम. डी. खैरनार यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगताचा प्राध्यापक प्रबोधिनीचा उद्देश स्पष्ट करुन समारोप केला. प्राध्यापक प्रबोधिनीच्या समन्वयिका प्रा. वैशाली कोष्टी यांनी प्रास्ताविक, सुत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन केले. व्याख्यानास सर्व प्राध्यापक आणि प्राध्यापिका आवर्जून उपस्थित होते.

No comments