परिवर्तनाच्या वाटेवर या उपक्रमा अंतर्गत विद्यार्थ्यांना तंत्रज्ञान विषयक मार्गदर्शन.. सातवे वाटसरू श्री जमाल तडवी यांचे मार्गदर्शन.. रावेर...
परिवर्तनाच्या वाटेवर या उपक्रमा अंतर्गत विद्यार्थ्यांना तंत्रज्ञान विषयक मार्गदर्शन..
सातवे वाटसरू श्री जमाल तडवी यांचे मार्गदर्शन..
रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
जिल्हा परिषद मराठी मुलांची शाळा सहस्त्रलिंग ता रावेर येथे परिवर्तनाच्या वाटेवर या उपक्रमा अंतर्गत सातवे वाटसरू श्री जमाल तडवी यांचे विद्यार्थ्यांना तंत्रज्ञान विषयक मार्गदर्शन प्रथम श्री जमाल तडवी यांचे स्वागत शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री युनूस तडवी यांनी पुस्तक व पुष्पगुच्छ देऊन केले. शाळेचे मुख्याध्यापक श्री विकास सुरवाडे सरांनी विद्यार्थ्यांना त्यांचा परिचय करून दिला. तदनंतर श्री जमाल तडवी यांनी विद्यार्थ्यांना मोबाईल, संगणक, लॅपटॉप यांचे कार्य कसे चालते व याचा शिक्षणासाठी कसा उपयोग होतो,
तंत्रज्ञानाशी मैत्री करून आपण आपल्या ज्ञान व कौशल्यात कशी भर घालू शकतो याचे काही प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना दाखवले. चॅट जीपीटी, ए आय या संकल्पना सोप्या भाषेत समजावून सांगितल्या. भविष्यात जो आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारेल तो निश्चितच प्रगती करेल म्हणून शिक्षणासोबतच तंत्रज्ञानाची सुद्धा कास धरा व शिक्षणासाठी, अध्ययन अध्यापनासाठी तंत्रज्ञानाबाबत अद्ययावत राहण्याचे आवाहन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शालेय व्यवस्थापन समिती सदस्य श्री आसिफ तडवी यांनी केले व आभार इयत्ता पाचवी चा विद्यार्थी अलिम तडवी याने मानले .
No comments