adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

श्री साई इंग्लिश मिडीयम स्कूल, गलंगी येथे 'जागतिक आदिवासी दिवस'साजरा तर राखी बनविणे स्पर्धा व रक्षाबंधन संपन्न

 श्री साई इंग्लिश मिडीयम स्कूल, गलंगी येथे  'जागतिक आदिवासी दिवस'साजरा तर राखी बनविणे स्पर्धा व रक्षाबंधन संपन्न  मच्छिंद्र कोळी गलं...

 श्री साई इंग्लिश मिडीयम स्कूल, गलंगी येथे  'जागतिक आदिवासी दिवस'साजरा तर राखी बनविणे स्पर्धा व रक्षाबंधन संपन्न 


मच्छिंद्र कोळी गलंगी प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 सरदार वल्लभभाई पटेल शैक्षणिक सेवाभावी संस्था संचलित श्री साई इंग्लिश मिडीयम स्कूल, गलंगी येथे  'जागतिक आदिवासी दिवस'साजरा करण्यात आला तर राखी बनविणे स्पर्धा व रक्षाबंधन संपन्न झाले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष  अजंतीसिमचे पोलिस पाटील ताईसो स्नेहलता कांतिलाल पाटील उपस्थित होत्या. कार्यक्रमात सर्व विद्यार्थ्यांनी आपापल्या परिने घरून राखी बनविण्याचे साहित्य आणून राखी बनविणे स्पर्धेत सहभागी झालेत.


कार्यक्रमाच्या सुरुवातीला  अध्यक्षांच्या हस्ते प्रतिकात्मक रूपात पुजन  करण्यात आले. व विद्यार्थ्यींनी विद्यार्थ्यांना राख्या बांधल्यात.  मुलांनी आपल्या बहिणींसाठी प्रेम पुर्वक भेटकार्डे, भेटवस्तू दिल्यात. मुख्याध्यापक श्री उमेश महाजन  यांनी रक्षाबंधन सण, जागतिक आदिवासी दिवस याबद्दल माहिती सांगितली.कार्यक्रमाचे आभार शाळेचे समन्वयक श्री दिपक सोनवणे यांनी केले. एकंदरीत कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी सर्व शिक्षक  श्री.छोटु एस.सोनार, श्री.प्रविण एस.महाजन, सुवर्णा देशमुख,यमुना बाविस्कर, दिपाली शिरसाठ,मानसी पाटील व शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रयत्न केले.

No comments