adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

मानसिक आरोग्य काळाची गरज - प्रा. डॉ.छाया ठिंगळे ( समुपदेशक)

 मानसिक आरोग्य काळाची गरज - प्रा. डॉ.छाया ठिंगळे ( समुपदेशक)  मुक्ताईनगर प्रतिनिधी सतीश गायकवाड (संपादक -:- हेमकांत गायकवाड)      खडसे महावि...

 मानसिक आरोग्य काळाची गरज - प्रा. डॉ.छाया ठिंगळे ( समुपदेशक) 


मुक्ताईनगर प्रतिनिधी सतीश गायकवाड

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

     खडसे महाविद्यालयातील मानसशास्त्र विभाग व समुपदेशन केंद्रामार्फत महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत बचत गट व उन्नती लोकसंचालिका साधन केंद्र येथे दहा बचत गटाच्या महिला उपस्थित होत्या या कार्यक्रमांमध्ये प्रमुख वक्ते म्हणून प्रा.डॉ. छाया ठिंगळे( समुपदेशक) होत्या यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये आजच्या आधुनिक जगात धावपळीच्या युगात, जाहिरातीच्या, मॉडलिंगच्या दुनियेत, जीवन जगत असताना आपले शारीरिक व मानसिक आरोग्य चांगले असणे गरजेचे आहे. चांगले ठेवणे गरजेचे आहे. मानसिक आरोग्य काळाची गरज आहे. महिलांनी आपल्या कामाबरोबरच आपले शारीरिक मानसिक आरोग्य चांगले ठेवावे आपल्या जीवनामध्ये अनेक सुख, दुःख, आनंद, येत राहतात परंतु कधीकधी दुःख हे पचवायला असाहाय्य होते आणि त्यातून नैराश्य निर्माण होते यासाठी सर्वांना मानसिक आरोग्य काय आहे हे समजून घेणे गरजेचे आहे कुटुंबामध्ये राहत असताना समायोजन साधने महत्त्वाचे आहे. असे त्यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये व्यक्त केले. कार्यक्रमाचे सहाय्यक बचत गट समन्वयक श्रीमती माया ताई तायडे, सौ. मंगलाताई चौधरी, सौ रत्नाताई माळी कार्यक्रमाचे अथक परिश्रम घेतले तसेच तसेच कार्यक्रमाचे आभार वैशाली कोळी यांनी केले. बहुसंख्याने बचत गटाच्या महिला उपस्थित होत्या.

No comments