adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

हर घर तिरंगा उपक्रमअंतर्गत थेपडे विद्यालयात राखी बनविणे कार्यशाळा संपन्न

 हर घर  तिरंगा उपक्रमअंतर्गत थेपडे विद्यालयात राखी बनविणे कार्यशाळा संपन्न  जळगाव जिल्हा प्रतिनिधी समाधान पाटील  (संपादक -:- हेमकांत गायकवाड...

 हर घर  तिरंगा उपक्रमअंतर्गत थेपडे विद्यालयात राखी बनविणे कार्यशाळा संपन्न 


जळगाव जिल्हा प्रतिनिधी समाधान पाटील 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

     जळगाव तालुक्यातील म्हसावद   येथे दि. 5/8/2025 रोजी शासनाच्या परिपत्रकानुसार "हर घर तिरंगा" या उपक्रमांतर्गत राखी बनविणे कार्यशाळा 

स्वा सै पं ध थेपडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय म्हसावद ता.जि. जळगाव या विद्यालयात घेण्यात आली .या स्पर्धेत विद्यालयातील एकूण 102 विद्यार्थिनींनी  सहभाग नोंदविला. यात तिरंग्याचा रंगांचा वापर करून तसेच टाकाऊ वस्तु पासून सुंदर व आकर्षक, मनमोहक अशा "तिरंगा" राख्या तयार केल्या. तयार केलेल्या राख्या देशाचे संरक्षण करणाऱ्या सैनिकांना पाठवणार आहेत. सैनिकांविषयी असलेला आदर, देशाप्रती कर्तव्यभावना तसेच देशाचे व सैनिकांचे महत्त्व  याबद्दल विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री पी डी चौधरी सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.सदर प्रसंगी उपमुख्याध्यापक श्री जी डी  बच्छाव,सर पर्यवेक्षक श्री के पी पाटील सर तसेच या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रीमती व्ही. एम. सूर्यवंशी मॅडम श्रीमती  योगिता पाटील मॅडम व कलाशिक्षक श्री डी एम सोनवणे सर यांनी विशेष परिश्रम घेतले. इतर सर्व शिक्षक बंधू-भगिनींनी सहकार्य केले

No comments