adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

नांदेड जिल्हा हादरला, मुलीचे विवाहबाह्य संबंधातून लेकीसह, प्रियकराला संपविले, आरोपी वडील स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर..!!

 नांदेड जिल्हा हादरला, मुलीचे विवाहबाह्य संबंधातून लेकीसह, प्रियकराला संपविले, आरोपी वडील स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर..!!   सौ. संगीता इंनकर-...

 नांदेड जिल्हा हादरला, मुलीचे विवाहबाह्य संबंधातून लेकीसह, प्रियकराला संपविले, आरोपी वडील स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर..!!  


सौ. संगीता इंनकर-पुरीगोसावी ( नांदेड जिल्हा ) प्रतिनिधी. 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

नांदेडमध्ये ऑन किलिंगची धक्कादायक घटना समोर आली आहे. उमरी तालुक्यांतील गोळेगांव येथे सोमवारी (दि. 25) संध्याकाळी जन्मदात्या पित्यानेच आपल्या लेकीसह तिच्या प्रियकराला संपविले आहे. या घटनेमध्ये दोघांना मारहाण करून विहिरीत फेकून दिले त्यानंतर स्वतः आरोपी वडील पोलीस ठाण्यात जावुन गुन्ह्याची कबुली दिली आहे. संजीवनी कमळे (रा. गोळेगांव )  आणि लखन भंडारे (रा. बोरजुत्री) अशी मयतांची नावे आहेत. याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीवरून संजीवनीचे एक वर्षापूर्वी गोळेगावांतील सुधाकर कमळे याच्याशी लग्न झाले होते. मात्र विवाहाआधीं पासूनच संजीवनीचे लखन भंडारे यांच्यासोबत प्रेमसंबंध होते. सोमवारी दुपारी सासरची मंडळी घराबाहेर गेल्याने संजीवनीने आपल्या प्रियकराला घरी बोलावले पण अचानक परतलेल्या पती व कुटुंबीयांनी त्यांना नको, त्या अवस्थेत पाहिले, असता हा प्रकार समोर आला आणि सासरच्या मंडळींनी तिच्या वडिलांना सांगितले. याच रागांच्या भरात जन्मदात्या पित्यानेच आपल्या लेकीसह प्रियकराला संपविले आहे. या सर्व घटनेत आरोपी वडील मारुती सुरणे स्वता: मी मुलीला आणि तिच्या प्रियकराला संपविले आहे अशी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची कबुली दिली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक अविनाश कुमार अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव उपविभागीय पोलिस अधिकारी दशरथ पाटील यांच्यासह उमरी पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते.

No comments