अंतुर्ली ता. मुक्ताईनगर येथे छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर संपन्न किरण धायले मुक्ताईनगर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) महसूल दिन...
अंतुर्ली ता. मुक्ताईनगर येथे छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर संपन्न
किरण धायले मुक्ताईनगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
महसूल दिनाचे औचित्य साधत महसूल विभागाच्या वतीने 1ऑगस्ट ते 7ऑगस्ट पर्यन्त महसूल सप्ताह साजरा करण्यात येतो.मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली येथे महसूल समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमात मुक्ताईनगर तालुक्याचे आमदार चंद्रकांत पाटील, मुक्ताईनगर तहसीलदार गिरीश वखारे, नायब तहसीलदार प्रदीप झांबरे,व निकेतन वाडे यांची उपस्थिती होती.
मुक्ताईनगरचे तहसीलदार गिरीश वखारे, नायब तहसीलदार प्रदीप झांबरे,निकेतन वाडे यांचे हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली.या प्रसंगी कर्यक्रमात आमदार चंद्रकांत पाटील, तहसीलदार गिरीश वखारे,नायब तहसीलदार प्रदीप झांबरे व निकेतन वाडे, समाजसेवक एस. ए.भोई सर,अंतुर्ली ग्रामपंचायत सरपंच सौ. सुलभाताई शिरतुरे,उपसरपंच गणेश तराळ,आमदार चंद्रकांत पाटील यांच्या कन्या संजना पाटील, तलाठी गणेश मराठे,,पोलीस पाटील किशोर मेढे, अमित इंगळे,ग्रामसेवक महेंद्र दुट्टे,अनिल वाडीले, शे. भैय्याजी,शे. बाबू हुसैन, नरेंद्र दुट्टे मोहन बेलदार, राजू कोतवाल, मुरली महाजन, निलेश लांडे, पंकज पिंगळे, व सर्व महसूल , आरोग्य व सर्व लाभार्थी हे उपस्थित होते.यावेळी आमदार चंद्रकांत पाटील,व तहसीलदार गिरीश वखारे यांनी आपलें मनोगत व्यक्त करून महसूल सप्ताह बद्धल माहिती सांगितली. तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक दाखल्यांचे वाटप करण्यात आले,तसेच संजय गांधी निराधार योजनेतील मंजुरीचे पत्र वाटप,निराधार योजनेतील लाभार्त्यांचे प्रलबीत केव्हायसी,पंचायत समिती कृषी विभागाच्या वतीने लाभाच्या मंजुरीचे पत्र व इतर. महसूल विभागाच्या वतीने विविध कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांना फार्मर आयडी कार्डचे वाटप करण्यात आले. सर्व कल्यानकारी योजने बद्धल माहिती सांगितली.

No comments