दोन वर्षापूर्वी अपहरण झालेल्या मुलीचा राहुरी पोलिसांकडून शोध आणी सुटका ऑपरेशन मुस्कान अंतर्गत वर्षभरात राहुरी पोलीसांनी लावला एकूण ७३ मुली...
दोन वर्षापूर्वी अपहरण झालेल्या मुलीचा राहुरी पोलिसांकडून शोध आणी सुटका
ऑपरेशन मुस्कान अंतर्गत वर्षभरात राहुरी पोलीसांनी लावला एकूण ७३ मुलींचा शोध
जावेद शेख/ राहुरी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
राहुरी पोलीस स्टेशन येथे गु.र.नंबर ८७६/२०२३ भारतीय दंड विधान कलम ३६३ प्रमाणे दिनांक ११/०८/२०२३ रोजी गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. सदर गुन्ह्यामध्ये अपहरीत मुलीबाबत काहीएक माहिती उपलब्ध नसतांना गुप्त बातमीदाराच्या मदतीने व तांत्रिक तपासाद्वारे तसेच अथक परिश्रम घेवुन गुन्ह्यातील अपहरीत मुलीचा माग काढुन तिचा शोध घेऊन तीला राहुरी पोलीस स्टेशनला आणून सदर पीडितेस तिचे नातेवाईकांच्या ताब्यात दिले आहे. व अपहरण करणारा युवक करण अशोक पवार वय २३ वर्ष रा. खुडसरगांव ता. राहुरी यास ताब्यात घेऊन पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजु जाधव , पोकॉ. गणेश लिपने हे करत आहेत.
तसेच ऑपरेशन मुस्कान अंतर्गत राहुरी पोलीस स्टेशन हद्दीतील मुलींचा शोध घेऊन गेल्या वर्षभरात ७३ मुलींचा शोध घेऊन त्यांच्या पालकांच्या ताब्यात दिले. सदरची कारवाई सोमनाथ घार्गे - पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, सोमनाथ वाकचौरे - अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर, डॉ. बसवराज शिवपूजे - उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपूर उपविभाग जिल्हा अहिल्यानगर यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली पो.नि. संजय आर.ठेंगे, पोसई राजू जाधव , पोहेकॉ. राहुल यादव, पोकॉ.अशोक शिंदे पोकॉ. गणेश लिपणे पोकॉ. शेषराव कुटे , मपोकॉ. वृषाली कुसळकर, अंजली गुरवे नेमणुक राहुरी पोलीस स्टेशन जि. अहिल्यानगर व पो.ना.संतोष दरेकर, नेमणुक अपर पोलीस अधीक्षक कार्यालय श्रीरामपूर जि. अहिल्यानगर मोबाईल सेल यांनी केलेली आहे.
वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111

No comments