वरखेड येथील तायडे परिवाराने समाजासमोर निर्माण केला आदर्श अमोल बावस्कार बुलढाणा (संपादक -:- हेमकांत गायकवाड) मलकापूर : घरातील कोणाचे निधन...
वरखेड येथील तायडे परिवाराने समाजासमोर निर्माण केला आदर्श
अमोल बावस्कार बुलढाणा
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
मलकापूर : घरातील कोणाचे निधन झाल्यास १३ दिवस सुतक व कोणाचा जन्म झाल्यास १२ दिवस इरधी पाळण्याची परंपरा आपल्या समाजात आहे. मात्र या जुनाट रूढी-परंपरा कालांतराने कालबाह्य झाल्या पाहिजे. तब्बल १३ दिवस घरातच बसून राहणे कु'लेही शुभकार्य न करणे याला कोणीतरी आळा बसला पाहिजे, या हेतुने वरखेड येथील तायडे परिवाराने भिमराव पंढरी तायडे यांच्या तेरवीचा व सुतक फिटविण्याचा कार्यक्रम तिसर्या दिवशी संपुष्टात आणत तसेच यापुढे इरधीही पाचव्याच दिवशी संपुष्टात आणण्याचा 'रावच वरखेड येथील तायडे परिवाराने घेत समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे.
वरखेड येथील भिमराव पंढरी तायडे यांचे १५ ऑगस्ट रोजी निधन झाले होते. सर्वसामान्य आपण १३ दिवस सुतक पाळतो. मात्र वरखेड ता.मलकापूर जि.बुलढाणा येथील सर्व तायडे परिवाराने एकत्र येत आज १७ ऑगस्ट रोजी परिवाराच्या वतीने एक 'रावच संमत केला असून यापुढे कु'लीही परिवारात मयत झाल्यास तिसर्या दिवशी सर्व विधी आटपीत सुतक मिटवावे. तसेच कोणाच्याही घरात मुल जन्माला आल्यास १२ दिवसा ऐवजी पाचव्या दिवशी इरधी संपुष्टात आणावी. असा 'राव एकमताने पारीत केला.
यावेळी वरखेड येथील सोपान भिमराव तायडे, माजी उपसरपंच विश्वंभर बाबाराव तायडे, दिनकर बाबाराव तायडे, तेजराव मनोहर तायडे, माजी सरपंच निवृत्ती रामभाऊ तायडे, सेवानिवृत्ती पोलिस ज्ञानेश्वर शालीकराम तायडे, माजी शिक्षक प्रल्हादराव देवराव तायडे, अनिल नारायण तायडे, विलास दौलतराव तायडे, रविंद्र वसंतराव तायडे, नारायण वसंतराव तायडे, प्रमोद वसंतराव तायडे, गजानन श्रीराम तायडे, श्याम विश्वासराव तायडे, शंकर महादेवराव तायडे, रामदास मुरलीधर तायडे, अजाबराव पंजाबराव तायडे, सुनिल रमेशराव तायडे, सुहास विश्वासराव तायडे, अमोल अशोकराव तायडे, हनुमंत प्रल्हादराव तायडे, सुनिल नारायणराव तायडे, अजय राजेंद्र तायडे, अमोल सुदामा तायडे, शिवाजी प्रल्हादराव तायडे, वैâलास दौलतराव तायडे, श्रीकांत अशोकराव तायडे, विनोद प्रल्हादराव तायडे, सचिन निवृत्ती तायडे, योगेश विश्वंभर तायडे, मयुर विनोद तायडे, श्रीधर मुरलीधर तायडे, राजेंद्र मधुकरराव तायडे, नागेश मधुकरराव तायडे, चंद्रशेखर रमेशराव तायडे आदींसह तायडे परिवारातील सदस्य हजर होते.

No comments