adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

नगरपरिषद गणपती मंडळाचा आगळावेगळा उपक्रम : ‘Wall-E’च्या माध्यमातून स्वच्छतेचा संदेश

 नगरपरिषद गणपती मंडळाचा आगळावेगळा उपक्रम :  ‘Wall-E’च्या माध्यमातून स्वच्छतेचा संदेश   चोपडा प्रतिनिधी : (संपादक -:- हेमकांत गायकवाड) नगरपरि...

 नगरपरिषद गणपती मंडळाचा आगळावेगळा उपक्रम : ‘Wall-E’च्या माध्यमातून स्वच्छतेचा संदेश  


चोपडा प्रतिनिधी :

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

नगरपरिषद चोपडा गणपती मंडळातर्फे यावर्षी पर्यावरणपूरक व समाजजागृती करणारा देखावा साकारण्यात आला आहे. यामध्ये तुरटीचा गणपती बसविण्यात आला असून बांबूपासून आकर्षक सजावट करण्यात आली आहे. देखाव्यात पर्यावरण संवर्धन आणि नशामुक्तीचे संदेश देणारी पोस्टर्स व बॅनर्स लावण्यात आले आहेत. विशेष आकर्षण ठरत आहे Wall-E, जो फेकलेल्या व खराब वस्तूंपासून साकारला गेला आहे. हा छोटा रोबोट पृथ्वीवरील प्लास्टिक व इतर कचरा गोळा करून "प्लास्टिक बिल्डिंग" तयार करीत आहे आणि पृथ्वीला स्वच्छ करण्याचे प्रतीक म्हणून मांडण्यात आला आहे.



यासोबतच Wall-E विषयी माहिती देणारे बॅनर्स, ध्वनिफिती व चित्रफीत देखाव्याला जोडण्यात आल्या आहेत. स्वच्छ भारत अभियान व माझी वसुंधरा अभियान यांचाही स्पर्श या उपक्रमाला देण्यात आला आहे. विशेष म्हणजे Wall-E चित्रपट सहजरीत्या पाहण्यासाठी व डाउनलोड करण्यासाठी QR कोडची सुविधाही देण्यात आली आहे.मुख्याधिकारी नगरपरिषद चोपडा यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, “नगरपरिषद गणपतीचा हा देखावा पाहण्यासाठी मोठ्या संख्येने यावे, स्वच्छतेबाबत नवीन प्रेरणा घ्यावी व आपल्या परिसराच्या स्वच्छतेसाठी कार्यरत व्हावे.” नगरपरिषद चोपडा गणपती मंडळाचा हा उपक्रम शहरात स्वच्छतेबाबत नवीन चळवळ निर्माण करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. 


No comments