तब्बल 35 लाखांचा हिरा गुटखा जप्त..जामखेड पोलीसांची मोठी कामगिरी सचिन मोकळं अहिल्यानगर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) अहिल्यानगर:-दि.27/09/2...
तब्बल 35 लाखांचा हिरा गुटखा जप्त..जामखेड पोलीसांची मोठी कामगिरी
सचिन मोकळं अहिल्यानगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अहिल्यानगर:-दि.27/09/2025 रोजी जामखेड पोलीस स्टेशन हद्दीत पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी हे पोलीस पथकासह गस्त करत असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली की, एका टेम्पोद्वारे अवैधरित्या गुटखा वाहतूक केली जात आहे. मिळालेल्या माहितीवरून पोलीस पथकाने जामखेड तालुक्यातील आरणगाव येथे सापळा रचून तपासणी सुरू केली.दरम्यान, संशयित टेम्पो क्रमांक एमएच-12 वाय बी-0823 आला असता त्याला अडवून तपासणी करण्यात आली.टेम्पो चालक वैभव अशोक घायाळ (रा.गवळवाडी जि.बीड) याच्या ताब्यातील वाहनात 34 लाख 94 हजार 640/- रुपये किमतीचा हिऱ्याचा गुटखा आढळून आला.मुद्देमालासह टेम्पो जप्त करण्यात आला असून आरोपी वैभव अशोक घायाळ यास ताब्यात घेऊन त्याच्या विरुद्ध गुन्हा क्रमांक 527/2025 भा.दं.सं. कलम 123,223,274,275, 3 (5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकुमार सोनवलकर हे करीत आहे.
या कारवाईत पोलीस अधीक्षक श्री.सोमनाथ घार्गे,अपर पोलीस अधीक्षक,उपविभागीय पोलीस अधिकारी कर्जत विभाग प्रवीणचंद्र लोखंडे,स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी, सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकुमार सोनवलकर,पोलीस उपनिरीक्षक किशोर गावडे, पोलीस अंमलदार कुलदीप घोळवे देविदास पळसे महादेव मिसाळ होमगार्ड संदीप चव्हाण यांनी केली आहे.

No comments