adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

तालुकास्तरीय शासकीय क्रीडा स्पर्धेत महिला मंडळ शाळा कबड्डीत विजयी

 तालुकास्तरीय शासकीय क्रीडा स्पर्धेत महिला मंडळ शाळा कबड्डीत विजयी  चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) चोपडा -  तालुकास्तरीय शासकी...

 तालुकास्तरीय शासकीय क्रीडा स्पर्धेत महिला मंडळ शाळा कबड्डीत विजयी 


चोपडा प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

चोपडा -  तालुकास्तरीय शासकीय क्रीडा स्पर्धेत कबड्डी ह्या क्रीडा प्रकारात येथील महिला मंडळ माध्यमिक विद्यालयाच्या मुलींच्या संघाने तालुकास्तरावर अजिंक्य ठरत जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी हा संघ पात्र ठरला आहे. 

       १४ वर्ष आतील मुलींचा व मुलांच्या कबड्डी स्पर्धा बालमोहन विद्यालय येथे संपन झाल्या. त्यामध्ये येथील महिला मंडळ माध्यमिक विद्यालयाचा संघ सलग ४ सामन्यात विजयी होत जिल्हास्तरासाठी पात्र ठरला. अंतिम सामना हा लिटल हार्ट इंग्लिश स्कूल विरुद्ध महिला मंडळ विद्यालय असा रंगला.  या चुरशीच्या सामन्यात महिला मंडळ संघाने बाजी मारत तालुक्यात आपला प्रथम क्रमांक प्राप्त करत जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्रता गाठली आहे. 

तर मुलांच्या संघाने तृतीय क्रमांक मिळवत यश संपादन केले. तसेच १९ वर्षाखालील मुलींच्या संघाने तालुक्यात द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे. या विद्यार्थांना क्रीडा प्रशिक्षक योगेश शिरसाठ व क्रीडा शिक्षक विनोद शिरसाठ यांचे मार्गदर्शन लाभले.

       यशस्वी विद्यार्थ्यांचे माजी विधानसभा अध्यक्ष प्रा. अरुणभाई गुजराथी, संस्थेच्या अध्यक्ष सौ. पूनम गुजराथी, उपप्राचार्य डॉ. आशिष गुजराथी, मुख्याध्यापक सुनील पाटील, पर्यवेक्षक विजय पाटील यांच्यासह शिक्षक शिक्षकेतर वृंदाने, शाळेतील विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले असून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

No comments