धनाजी नाना महाविद्यालय फैजपूर येथे एनएसएस दिवस उत्साहात साजरा. इदू पिंजारी फैजपूर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) दि.२४ सप्टेंबर २०२५ रोजी ...
धनाजी नाना महाविद्यालय फैजपूर येथे एनएसएस दिवस उत्साहात साजरा.
इदू पिंजारी फैजपूर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
दि.२४ सप्टेंबर २०२५ रोजी धनाजी नाना महाविद्यालय, फैजपूर एनएसएस विभागातर्फे एनएसएस दिवस साजरा करण्यात आला. प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. हरीश नेमाडे यांनी अध्यक्ष स्थान स्वीकारले. प्रमुख व्याख्याते म्हणून प्रा. डॉ. कल्पना पाटील यांनी मार्गदर्शन केले. एन एस एस कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. सतीश दत्तात्रय पाटील, महिला कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. सविता कलवले व सहाय्य कार्यक्रम अधिकारी प्रा. विकास वाघुळदे आणि हे एन एस एस चे स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रमुख व्याख्याते प्रा. डॉ. कल्पना पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना नमूद केले की एन एस एस ची स्थापना २४ सप्टेंबर १९६९ रोजी झाली. तसेच व्यक्तिमत्व विकासासाठी एनएसएस हे खूप मोठे व्यासपीठ आहे. त्याचा उपयोग करून एनएसएसचा विद्यार्थी हा समाजाभिमुख होऊ शकतो असे प्रतिपादन केले.
अध्यक्षीय समारोप करताना प्रा. डॉ. हरीश नेमाडे यांनी एनएसएसच्या विद्यार्थ्यांना स्वच्छता अभियान, प्लास्टिक मुक्त अभियान, तंबाखूमुक्त अभियान राबविण्यासाठी आवाहन केले. प्रसंगी महाविद्यालयाचे विद्यार्थी विकासाधिकारी प्रा. डॉक्टर विजय सोनजे माजी कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. दीपक सूर्यवंशी उपस्थित होते. एनएसएस चे स्वयंसेवक रिया पाटील, अश्विनी पवार, श्वेता भालेराव यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन रोहिणी माळी व आभार प्रदर्शन कीर्ती महाजन ने केले.

No comments