भारतीय बौद्ध महासभा कार्यकारणी घोषित मच्छिंद्र कोळी गलंगी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पंचायत समिती सभागृ...
भारतीय बौद्ध महासभा कार्यकारणी घोषित
मच्छिंद्र कोळी गलंगी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पंचायत समिती सभागृह भुसावळ येथे भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. राजरत्न आंबेडकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली जळगाव जिल्हा कार्यकारिणीची घोषणा राज्य अध्यक्ष रवींद्र गुरचळ आणि राज्य महासचिव विजय बनसोड यांनी नुकतीच केली. जळगाव जिल्हा कार्यकारणी मध्ये प्रमिला किशोर भालेराव -अध्यक्ष, नकुल अमृत इंगळे-उपाध्यक्ष, चंद्रकांत यशवंत निकम उपाध्यक्ष, किशोर धांगो सोनवणे महासचिव, अक्षय पद्माकर पान पाटील सहसचिव, दीपक कालिदास करणकाळे मुख्य संघटक, किशोर रामदास भालेराव कोषाध्यक्ष, कैलास भिवा सुरवाडे सहकोषाध्यक्ष, भारत रामचंद्र लोखंडे सहसंघटक, विजय रामदास बाह्रे संस्कार समन्वयक, आनंदराव पुंडलिक खेडकर विहार समन्वयक, अरुण अमृत जोहरे सदस्य, सुभाष गंगाराम शिंदे सदस्य वसिम शमशुद्दीन खाटिक सदस्य याप्रमाणे कार्यकारणी घोषित करण्यात आली.
या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मा. शशिकांत इंगळे नायब तहसीलदार, राज्याध्यक्ष मा. रवींद्र गुरचळ सर,मा. बुधाजी वाढविंदे राज्य मुख्य संघटक,मा. हेमंत जाधव राज्य सहसचिव, मा.तुषार गोरे राज्य तक्रार निवारण समन्वयक, राज्य सदस्य मा. रामदास घेवंदे,मा. निरंजन जाधव, नाशिक विभाग प्रभारी मा. शुभांगी ताई डोंगरे, कोकण प्रभारी मा. महेंद्र जाधव, अमरावती विभाग प्रभारी मा. महादेव तायडे हे प्रामुख्याने उपस्थित होते.

No comments