माळीज क्लासेसचा राजा गणेशाचे विसर्जन भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) आज यावल येथे माळीज क्लासेसच्या गणपतीची थाटात व...
माळीज क्लासेसचा राजा गणेशाचे विसर्जन
भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
आज यावल येथे माळीज क्लासेसच्या गणपतीची थाटात विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीचे आकर्षण म्हणजे विद्यार्थ्यांच्या विविध पथकांचे संचलन यानिमित्त करण्यात आले होते. या विसर्जन मिरवणुकीत झांज पथक, मुलींचे लेझीम पथक, झेंडा पथक, मुलींचे गरबा पथक तसेच सर्वांचे लक्ष वेधून घेणारे बालगोपालांचे टाळ मृदुंगांच्या वाद्यांसहित वारकरी पथक काढण्यात आले होते. सजीव देखाव्यामध्ये अश्वारूढ जिजामाता या सर्वांच्या आकर्षणाच्या केंद्र ठरल्या. या मिरवणुकीमध्ये पारंपारिक वेशभूषेला महत्त्व देण्यात आले होते. विशेष म्हणजे पर्यावरणाला पूरक अशा शाडू मातीच्या गणपतीची मूर्तीचा वापर केल्यामुळे ती सर्वांना पर्यावरणाचा समतोल राखण्याचा संदेश देत होती. मिरवणुकीनंतर महाप्रसादाचे आयोजन देखील करण्यात आले होते. या मिरवणुकीच्या यशस्वी आयोजनासाठी माळीज क्लासेसचे संचालक के. एम. माळी, जयंत दंगाने, किरण सोनवणे, तेजस्विनी माळी, हर्षल माळी, तडवी मॅडम, कुरकुरे मॅडम तसेच शशिकांत वारूळकर आदींनी परिश्रम घेतले.

No comments