adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

ज्येष्ठ नागरिक आनंद मेळाव्यात आरोग्य विषयक मार्गदर्शनपर कार्यक्रम संपन्न ! आपले ठणठणीत आरोग्य हीच सर्वश्रेष्ठ संपती - गीतांजली अंभंग

  ज्येष्ठ नागरिक आनंद मेळाव्यात आरोग्य विषयक मार्गदर्शनपर कार्यक्रम संपन्न ! आपले ठणठणीत आरोग्य हीच सर्वश्रेष्ठ संपती - गीतांजली अंभंग  हेल्...

 ज्येष्ठ नागरिक आनंद मेळाव्यात आरोग्य विषयक मार्गदर्शनपर कार्यक्रम संपन्न !

आपले ठणठणीत आरोग्य हीच सर्वश्रेष्ठ संपती - गीतांजली अंभंग 

हेल्थ पॅराडाईज क्लबच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त ज्येष्ठ नागरिकांना आरोग्य विषयक सुवर्ण संधी  


श्रीरामपूर / प्रतिनिधी:

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

निवृत्त अभियंता प्रल्हाद अग्रवाल सर यांच्या मार्गदर्शनाखाली ज्येष्ठ नागरिक आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी वाढत्या वयासोबत ज्येष्ठ नागरीकांनी घ्यावयाची काळजी या विषयी येथील हेल्थ पॅराडाईज क्लब च्या संचालिका गीतांजली अभंग यांनी सुयोग्य मार्गदर्शन केले. 


यावेळी त्या म्हणाल्या की,आपले ठणठणीत आरोग्य हीच सर्वश्रेष्ठ संपती आहे, करीता आपल्या आरोग्याकडे कटाक्षाने लक्ष दिले गेले पाहिजे,तसेच केवळ वयोवृद्ध ज्येष्ठ नागरीकांनीच नव्हेतर तरुण, तरुणी,मध्यमवयीन तथा किशोरवयीन आणी बालके यांच्या आरोग्य आणी आहाराविषयी देखील काळजी घेणे ही नितांत गरजेचे असल्याचे त्या म्हणाल्या.तसेच वेळोवेळी आरोग्य तपासणी, वजन कमी करणे किंवा वाढवणे बीपी मधुमेह या आजारातून कसे मुक्त होता येईल या विषयी त्यांनी उपयुक्त माहिती विषद केली.या कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पुढे बोलताना त्या म्हणाल्या की,ज्येष्ठ नागरिकांना गणपती उत्सवानिमित्त हेल्थ पॅराडाईज क्लबच्या वतीने आरोग्याविषयी एक चांगली सुवर्ण संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे, ती म्हणजे

१५००/- रु. किमतीचा १० दिवसांचा बॉडी डिटॉक्स प्रोग्राम आता फक्त १५१/- रुपयांमध्ये उपलब्ध करून देण्यात आला आहे. यामध्ये ऑनलाईन / ऑफलाईन वर्कआऊट, Detox एनर्जी ड्रिंक्स, आरोग्य माहिती सत्र, आजाराविषयी तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन व सल्ला, वैयक्तिक आहार मार्गदर्शन, १० दिवसाचा बॉडी डिटॉक्स,तसेच प्रोग्राममुळे मिळणारे फायदे  पुढीलप्रमाणे. Energy वाढविते .स्टॅमिना वाढविते, शरीर Detoxify करते, मेंदूची कार्य क्षमता सुधारते,चयापचय क्रिया वाढविते, त्वचा तजेलदार बनवते,पचनक्रिया सुधारते, कॅलरी कमी करण्यास मदत करते,असे आरोग्य विषयक किती तरी फायदे आहेत ही सुवर्णसंधी केवळ गणपती उत्सवाच्या निमित्ताने असल्याने मर्यादित जागा आहेत करीता आजच  हेल्थ पॅराडाईज क्लब, हनमंत वस्तीगृह, माळी बोर्डिंग, श्रीरामपूर - संपर्क : 7977694492 याठिकाणी आपले ॲडमिशन बुक करावे असेही त्या म्हणाल्या.मोठ्या उत्साही वातावरणात  ज्येष्ठ नागरिक आनंद मेळावा संपन्न झाला.


वृत्त प्रसिद्धी सहयोग

समता मीडिया सर्व्हिसेस

 श्रीरामपूर - 9561174111

No comments