adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

म.फु.कृषी विद्यापीठाचे डॉ.साताप्पा खरबडे भारत शिक्षण रत्न पुरस्काराने सन्मानित

 म.फु.कृषी विद्यापीठाचे डॉ.साताप्पा खरबडे भारत शिक्षण रत्न पुरस्काराने सन्मानित  जावेद शेख / राहुरी  (संपादक -:- हेमकांत गायकवाड) येथील महात...

 म.फु.कृषी विद्यापीठाचे डॉ.साताप्पा खरबडे भारत शिक्षण रत्न पुरस्काराने सन्मानित 


जावेद शेख / राहुरी 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे अधिष्ठाता तथा संचालक शिक्षण डॉ. साताप्पा खरबडे यांना मानाचा समजला जाणारा राष्ट्रीय पातळीवरचा भारत शिक्षण रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

सदरचा पुरस्कार डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन टीचर्स वेल्फेअर असोसिएशन, बंगळुरू यांच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त प्रदान करण्यात आला. शिक्षण, संशोधन आणि विस्तार या क्षेत्रातील डॉ. खरबडे यांच्या  २९ वर्षांच्या उल्लेखनीय योगदानाचा गौरव म्हणून हा मानाचा पुरस्कार देण्यात आला आहे. डॉ. साताप्पा खरबडे यांचे ११५ शास्त्रीय लेख, १५५ तांत्रिक लेख विविध राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रकाशित झालेले असून त्यांनी ३० घडीपत्रिका व १० पुस्तकांचे लेखन केले आहे. त्यांच्या नावावर दोन पेटंट आहेत. त्यांनी आतापर्यंत एम. एस. सी. च्या २२ विद्यार्थ्यांना व आचार्य पदवीच्या १२ विद्यार्थ्यांना मार्गदर्शक म्हणून मोलाचे मार्गदर्शन केले आहे. त्यांनी शेतकऱ्यांसाठी २५ तंत्रज्ञान शिफारशी दिलेल्या असून,

४० पेक्षा अधिक राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय परिसंवादांमध्ये त्यांनी भाग घेतलेला आहे. त्यांना आतापर्यंत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरचे १२ पेक्षा जास्त विविध पुरस्कार मिळालेले असून त्यांनी कोलंबो, श्रीलंका व थायलंड या देशांमध्ये शैक्षणिक विषयासंदर्भात परदेशदौरे केलेले आहेत.

          डॉ. साताप्पा खरबडे यांना मिळालेला हा पुरस्कार त्यांच्या कृषी शिक्षण, कृषी संशोधन आणि विस्तार शिक्षणात केलेले उल्लेखनीय कार्य व कठोर परिश्रम, सातत्यपूर्ण प्रयत्न आणि समर्पण वृत्तीचा सन्मान आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठात कनिष्ठ संशोधन सहाय्यक म्हणून कार्याची सुरुवात करून डॉ. खरबडे यांनी कृषी महाविद्यालय नंदुरबार, कराड आणि कोल्हापूर येथे सहयोगी अधिष्ठाता म्हणून यशस्वी कामगिरी केलेली आहे. सध्या ते महात्मा फुले कृषी विद्यापीठात अधिष्ठाता या पदावर कार्यरत आहेत. 

डॉ. खरबडे यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख, संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के, विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे, कुलसचिव श्री. राजेन्द्रकुमार पाटील, नियंत्रक श्री. सदाशिव पाटील तसेच विद्यापीठातील इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

वृत्त प्रसिद्धी सहयोग

समता मीडिया सर्व्हिसेस

 श्रीरामपूर - 9561174111

No comments