प्रवरा सांस्कृतिक महोत्सवात महात्मा गांधी विद्यालय प्रथम अजीजभाई शेख / राहाता (संपादक -:- हेमकांत गायकवाड) तालुक्यातील प्रवरानगर येथील प्...
प्रवरा सांस्कृतिक महोत्सवात महात्मा गांधी विद्यालय प्रथम
अजीजभाई शेख / राहाता
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
तालुक्यातील प्रवरानगर येथील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या वतीने सालाबादप्रमाणे गणेश उत्सवाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या प्रवरा सांस्कृतिक महोत्सवामध्ये महात्मा गांधी विद्यालयातील माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांच्या गटाने प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे.
प्रवरानगर येथील प्रवरा सांस्कृतिक महोत्सव नुकताच संपन्न झाला.
या महोत्सवाचा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम काल प्रवरानगर येथील धनंजयराव गाडगीळ सभागृहात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के आदी मान्यवरांच्या हस्ते महात्मा गांधी विद्यालयातील कलावंतांना माध्यमिक गटात प्रथम क्रमांक प्राप्त केल्याबद्दल ट्रॉफी व बुके देऊन गौरविण्यात आले.
या विद्यालयातील विद्यार्थी अमन शेख यांनी स्वतः मेरा मुल्क मेरा देश हे गीत सादर केले. या गीतावर आदर्श ओहोळ, साईनाथ पाटील, साईराज तांबे, अर्शद शेख, अरमान शेख, सिद्धांत साळवे, अभिराज निर्मळ, समद शेख, सुबोध सोनवणे, ओम हांडे या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट नृत्यांचे सादरीकरण केले.
या यशस्वी कलावंतांचे स्थानिक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रावसाहेब म्हस्के, उपाध्यक्ष अरुण कडू, एकनाथराव घोगरे, माजी प्राचार्य भिमराव आंधळे, प्राचार्य विनायक मेथवडे, मुख्याध्यापिका नलिनी जाधव, उपमुख्याध्यापक दिलीप डहाळे, उपप्राचार्य अलका आहेर, पर्यवेक्षिका संगीता सांगळे सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ.शरद दुधाट, संजय ठाकरे, नरेंद्र ठाकरे, विलास गभाले, बाबासाहेब अंत्रे आदींसह विद्यार्थी पालक यांनी अभिनंदन केले आहे. या यशस्वी विद्यार्थ्यांना सांस्कृतिक विभाग प्रमुख रेणुका वर्पे, प्रियंका भालेराव यांचे मार्गदर्शन लाभले.
वृत्त विशेष सहयोग
डॉ.शरद दुधाट (सर) श्रीरामपूर
वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111

No comments