पुरीगोसावी यांच्या घरच्या लाडक्या बाप्पाला जड अंतःकरणाने भावुक निरोप; गणपती बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या..!! सौ. संगीता इंनकर ( सातारा जि...
पुरीगोसावी यांच्या घरच्या लाडक्या बाप्पाला जड अंतःकरणाने भावुक निरोप; गणपती बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या..!!
सौ. संगीता इंनकर ( सातारा जिल्हा ) प्रतिनिधी.
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
आज बाप्पांना निरोप देताना मनात श्रद्धा, समाधान आणि कृतज्ञता ठेवू या! गणरायांचे आशीर्वाद आपल्या सर्वांना सदैंव राहो, व समाजात सौहार्द नांदो, हीच मंगलमूर्ती चरणी प्रार्थना सर्वांना आनंद चतुर्थींच्या मनःपूर्वक शुभेच्छा... गणपती बाप्पांचे आज सर्वत्र विसर्जन हा क्षण कितीही भावुक असला तरी भक्तांच्या मनात नेहमीच एक आशा असते की बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या! गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षीं लवकर.. या याच जयघोषात दहा दिवसांच्या मंगल उत्सवानंतर बाप्पांना निरोप देण्याची वेळ येते. भाद्रपद मासातील शुल्क पक्षातील चतुर्थीं पासून सुरु होणाऱ्या गणेश चतुर्थीला घराघरांत विशेष महत्त्वं आहे. या दहा दिवसांमध्ये बाप्पाच्या दर्शनासाठी भक्तांची भक्ती भावाने तळमळलेले मन मोदकांची गोडी आरतीचे मधुर सुर, घरांतील हसरे चेहरे प्रत्यक्ष क्षण आनंदाने भरलेले असतात. विसर्जनाचा हा क्षण भावनांनी भरलेला असतो. अनेक जण डोळ्यामध्ये आंसु घेवुन बाप्पाला निरोप देतात तरीही पुढच्या वर्षी लवकर या अशी मनापासून प्रार्थना करत उत्सवांच्या आठवणी हृदयात साठवून घेतात. या दहा दिवसांच्या गणपती उत्साहांत घर आणि समाज एक ना, अनेक भक्ति संगम पाहायला मिळतो. भक्त आपल्या प्रियजनांना हा आनंद साजरा करण्यासाठी आणि बाप्पाला भावपूर्ण निरोप देण्यासाठी संदेश पाठवतात. गणपती बाप्पा तुझ्या प्रेमाने घर भरले... आता पुढच्या वर्षीं पुन्हा भेटू या! आणि उत्साहांची मजा दुप्पट करू या!

No comments