adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

ऑनलाइन फसवणूक लाखो रुपयांना गंडा तोफखान्यात गुन्हा दाखल

 ऑनलाइन फसवणूक लाखो रुपयांना गंडा तोफखान्यात गुन्हा दाखल  सचिन मोकळं अहिल्यानगर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) अहिल्यानगर (दि.१६):-खाद्य वितरण...

 ऑनलाइन फसवणूक लाखो रुपयांना गंडा तोफखान्यात गुन्हा दाखल 


सचिन मोकळं अहिल्यानगर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

अहिल्यानगर (दि.१६):-खाद्य वितरण अ‍ॅपवरून ऑनलाइन ऑर्डर केल्यानंतर ती न मिळाल्याने गुगलवर शोधलेल्या बनावट कस्टमर केअर नंबरवर कॉल करून तब्बल ४ लाख ६६ हजार रुपयांची मोठी फसवणूक झाल्याची घटना घडली आहे.याप्रकरणी मुरलीधर रंगनाथ काळे यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.काळे यांनी २० जुलै २०२५ रोजी दुपारी ४ वाजता ‘ब्लिंकिट’ अ‍ॅपवरून घरगुती वस्तूंची ऑर्डर केली. मात्र ऑर्डर वेळेत न आल्याने त्यांनी गुगलवर ‘ब्लिंकिट कस्टमर केअर’ शोधले आणि तेथे सापडलेल्या बनावट क्रमांकावर कॉल केला.त्या क्रमांकावरून अज्ञात व्यक्तीने त्यांच्याशी व्हॉट्सअ‍ॅप कॉलद्वारे संवाद साधत विश्वास संपादन केला आणि स्क्रीन शेअर करण्यास प्रवृत्त केले.२२ जुलै रोजी सायंकाळी ५.०२ वाजता, मुरलीधर काळे यांच्या एचडीएफसी बँक खात्यातून तब्बल ४ लाख ६६ हजार रुपये काढले गेले. ही रक्कम इंडियन ओव्हरसीज बँक व बँक ऑफ महाराष्ट्र या बँकांमध्ये ट्रान्सफर करण्यात आली असल्याची माहिती उजेडात आली.त्यानंतर मुरलीधर काळे यांनी राष्ट्रीय सायबर क्राईम पोर्टलवर तक्रार केली आणि त्यानंतर तोफखाना पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.अधिक तपास पोलीस करीत आहे.

No comments