मौर्य क्रांती संघातर्फे कवी अजय भामरे यांना द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक किरण चव्हाण अमळनेर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) मौर्य क्रांती ...
मौर्य क्रांती संघातर्फे कवी अजय भामरे यांना द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक
किरण चव्हाण अमळनेर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
मौर्य क्रांती महा( सेवा) संघ , महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने १३ ऑगस्ट २०२५ राष्ट्रमाता अहिल्यामाई होळकर स्मृतिदिनानिमित्त आयोजित भव्य राज्यस्तरीय काव्यवाचन स्पर्धेत शिक्षक,कवि अजय भामरे यांनी स्वरचित काव्यलेखन व वाचन केले होते. या स्पर्धेत त्यांच्या कवितेला द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक जाहीर झाले आहे. येत्या नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या राज्य अधिवेशनात मान्यवरांच्या हस्ते त्यांना रोख रक्कम, स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र व पुस्तके देऊन बक्षीस वितरण समारंभात गौरवण्यात येणार आहे. या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
यापूर्वी महाराष्ट्र व गोवा द्विस्तरीय राज्य काव्य स्पर्धेत त्यांच्या कवितेला प्रथम क्रमांकाचे बक्षीसही मिळालेले आहे.

No comments