जळगाव माध्यमिक शिक्षक पतपेढी तर्फे मयत सभासद वारसाला पंचवीस लाख रुपये मदतीचा धनादेश प्रदान इदू पिंजारी फैजपूर - (संपादक -:- हेमकांत गायक...
जळगाव माध्यमिक शिक्षक पतपेढी तर्फे मयत सभासद वारसाला पंचवीस लाख रुपये मदतीचा धनादेश प्रदान
इदू पिंजारी फैजपूर -
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर नोकरांची नागरी सहकारी पतपेढी मर्या., जळगाव तर्फे सभासदांचा यावर्षी रुपये २५ लाखचा वैयक्तिक अपघात विमा काढलेला होता.
पतपेढीच्या सभासद कै. अरुणा सुधाकर पाटील (उपशिक्षीका, श्री भुवनेश्वरी माध्यमिक विद्यालय, मनवेल, ता यावल, जि. जळगाव) यांचे दि.२ एप्रिल २०२५ रोजी अपघातात दुदैवी अपघाती निधन झाले होते. त्यांच्या कुटुंबाला अपघात विमा योजने अंतर्गत दि न्यु इंडिया एश्योरेंन्स कंपनी लि. कडून रुपये २५ लाखाचा धनादेश त्यांचे पती सुधाकर सुमेरसिंग पाटील यांना पतपेढीच्या प्रभारी अध्यक्षा श्रीमती वैशाली महाजन, मानद सचिव भगतसिंग पाटील, माजी अध्यक्ष तथा संचालक एस. डी. भिरुड , संचालक सिध्देश्वर वाघुळदे, शैलेश राणे, डिगंबर पाटील, जगदीश पाटील, जानकीराम सपकाळे, माजी अध्यक्ष संभाजी पाटील, भुसावळ माध्य, पतपेढीचे अध्यक्ष गोपाल पाटील, युवराज झोपे, राजेंद्र महाजन, अधिक्षक सुनिल महाजन, हिशोबनीस सुरेश पाटील यांच्या उपस्थितीत अदा करण्यात आला.

No comments