गोरगावलेचे शिक्षक नरेश बाविस्कर गुरूवंदना पुरस्काराने सन्मानित.. चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) चोपडा :- तालुक्यातील गोरगावल...
गोरगावलेचे शिक्षक नरेश बाविस्कर गुरूवंदना पुरस्काराने सन्मानित..
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
चोपडा :- तालुक्यातील गोरगावले बुद्रुक येथील रहिवासी व जि.प.शाळा नासलगाव (जि.नाशिक) येथे प्राथ.शिक्षक पदावर कार्यरत असलेले नरेश भिमराव बाविस्कर यांना दि रोटरी क्लब ऑफ नाशिक वेस्ट यांच्याकडून ज्ञान संस्कार व मुल्यांची जपवणूक करून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास केल्याबद्दल सन २०२५ चा गुरूवंदना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. नरेश बाविस्कर हे शेतकरी-शेतमजुर कुटुंबातील, त्यातच त्यांच्या लहानपणीच वडिलांचे निधन झाल्याने परिवारात ते सर्वात मोठे असल्याने सर्व जबाबदाऱ्या सांभाळून शिक्षण पूर्ण करून त्यांनी प्राथ.शिक्षकाची नोकरी मिळविली. आज त्यांच्या अथक प्रयत्नांना यश आले असून विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार व शिक्षण दिल्याने त्यांना नाशिक रोटरी वेस्टचे अध्यक्ष रोटेरियन राम पगारे, प्रकल्प सचिव ॲड.विरेंद्र लोणारी, प्रशासन सचिव योगेश अहिरे, सेवा प्रकल्प सहाय्यक मनिषा विसपुते यांच्या शुभहस्ते गुरूवंदना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
त्याबद्दल गोरगावलेचे माजी सरपंच जगन्नाथ बाविस्कर, सेवानिवृत्त मुख्याध्यापक मोहन कोळी, चोपडा ग.स.चे संचालक योगेश सनेर, मंगेश भोईटे, एकनाथ पाटील, शाखाधिकारी दिलीप सपकाळे, स्मिता मोरे, शरद पाटील, संजय पाटील, जगन्नाथ बाविस्कर यांचेसह सर्व कर्मचारी वृंद, कारगील ग्रुपचे कार्यकर्ते यांनी त्यांचे अभिनंदन केले. ग.स.चे रोखपाल योगेश भिमराव बाविस्कर यांनी सर्वांचे आभार मानले.

No comments