adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये हिंदी दिवस उत्साहात साजरा

 ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये हिंदी दिवस उत्साहात साजरा  चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड)  चोपडा: येथील महात्मा गांधी शिक...

 ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये हिंदी दिवस उत्साहात साजरा 


चोपडा प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 चोपडा: येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूल येथे हिंदी दिवस साजरा करण्यात आला. राष्ट्रभाषा दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात शाळेचे  मुख्याध्यापक अरुण पाटील, उपमुख्याध्यापिका अश्विनी पाटील, दिपाली पाटील, सुचिता पाटील आणि दीप्ती पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून सरस्वती वंदनेने करण्यात आली. 


शाळेतील शिक्षिका सुचिता पाटील यांनी हिंदी दिवसाचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले.यावेळी शाळेचे मुख्याध्यापक  अरुण पाटील यांनी भाषेचे महत्व पटवून सांगितले तसेच हिंदी बरोबरच इतर भाषा संवर्धनासाठी प्रयत्न करण्याची गरज अधोरेखित केली. संस्कृती शिंदे, ध्रुवी पाटील, आणि समृद्धी जैसवाल या इयत्ता नववी आणि दहावीच्या विद्यार्थिनींनी 'हिंद देश के निवासी' हे गीत सादर केले. या गीतासाठी त्यांना शाळेतील संगीत शिक्षिका अश्विनी ढबू यांचे मार्गदर्शन लाभले. इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांनी हिंदी भाषेचे महत्व विशद करणारी नाटिका सादर केली. या नाटिकेमध्ये रीत मगरमलानी, पलक महाजन, हर्षाली पाटील आणि विहान राठोड हे इयत्ता सहावीचे विद्यार्थी सहभागी झाले होते. या नाटिकेसाठी विद्यार्थ्यांना शाळेतील शिक्षिका दिपाली पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. 

          हिंदी दिनानिमित्त विद्यार्थ्यांसाठी विविध  उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. पूर्व प्राथमिक विभाग आणि इयत्ता पहिली व दुसरीसाठी हिंदी गीत गायन, कथा कथनाचे उपक्रम आयोजित करण्यात आले. इयत्ता तिसरी चौथीसाठी सुंदर हस्ताक्षर लेखन, इयत्ता पाचवी व सहावी साठी कथालेखन इयत्ता सातवी व आठवीसाठी निबंध लेखन यांसारख्या विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.

शाळेतील कलाशिक्षक शकील अहमद यांनी हिंदी दिनाच्या अनुषंगाने आकर्षक फलक रेखाटन केले. या विविध स्पर्धांसाठी हिंदी शिक्षिका जयश्री सुर्यवंशी, सुचिता पाटील, शितल भावसार आणि योगिता भोई यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील शिक्षिका जयश्री सुर्यवंशी यांनी केले तर आभार प्रदर्शन शाळेतील शिक्षिका सुचिता पाटील यांनी केले. हिंदी दिनाच्या उपक्रमांसाठी समन्वयक डॉ.  दीनानाथ पाटील, मुख्याध्यापक अरुण पाटील आणि उपमुख्याध्यापिका अश्विनी पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लस्मिता कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अॕड. संदीप सुरेश पाटील, सचिव डाॕ.सौ.स्मिता संदीप पाटील यांनी आनंद व्यक्त केला.

No comments