adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

साहित्य अकादमीच्या 'उन्मेष' या आंतरराष्ट्रीय साहित्य संमेलनात भिमराज पावरा यांची निवड

 साहित्य अकादमीच्या 'उन्मेष' या आंतरराष्ट्रीय साहित्य संमेलनात भिमराज पावरा यांची निवड   चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड...

 साहित्य अकादमीच्या 'उन्मेष' या आंतरराष्ट्रीय साहित्य संमेलनात भिमराज पावरा यांची निवड  


चोपडा प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

        संस्कृति मंत्रालय व भारतीय साहित्य अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने पटना (बिहार) येथे २५ ते २८ सप्टेंबर या कालावधीत होत असलेल्या 'उन्मेष' या आंतरराष्ट्रीय संमेलनात महादेव दोंडवाडा येथील आदिवासी कवी भिमराज पावरा यांची निवड झाली आहे.

         सदर साहित्य महोत्सवात देश विदेशातील तसेच राज्य व आदिवासी क्षेत्रातील, कवी, लेखक, संशोधक, समिक्षक, साहित्यीक तसेच विविध बोलीतील कवी, लेखक असे ६०० हून अधिक साहित्यिक मातृभाषेत प्रतिनिधित्व करतील. त्यात सातपुड्यातील आदिवासी कवी भिमराज पावरा यांना सातपुड्यात बोलली जाणारी पावरा बोलीतून प्रतिनिधित्व करणार आहेत. कवी भिमराज यांनी  सातपुड्यातील आदिवासी पावरा संस्कृती व बोलीभाषा यांचे संर्वधन करणे तसेच बोलीभाषा व सांस्कृतिक इतिहास जगासमोर मांडणे या दृष्टीने 'आदिवासी  पावरा  संस्कृतीन जीवणो' मराठी, हिंदी भाषेत साहित्य, तसेच  वातरा - आदिवासी पावरा संस्कृतींमधील लोक कथासंग्रह, खुडेन वेलाविखा, असे त्यांचे साहित्य प्रकाशित आहे.

     कवी भिमराज पावरा हे सातपुड्यातील महादेव दोंडवाडा  ता. शिरपूर जि.धुळे या गावीचे असून संध्या प्राथमिक शिक्षक अनुदानित आदिवासी प्राथ. आश्रम शाळा सनपुले ता. चोपडा जि. जळगाव येथे कार्यरत आहेत. आदिवासींचा सांस्कृतिक इतिहास व जीवन प्रवाहातील प्रश्न साहित्यात आणत आहे. या संमेलनात त्यांची निवड झाल्याबद्दल चंद्रकांत पाटील, नितीन पाटील, प्रविण पवार, संजय पावरा, नामदेव पटले, संतोष पावरा, मोतिराम पावरा, ईश्वर पावरा, विजय पावरा, सोनू पावरा, युवराज पवार, विश्राम पावरा, छोटीराम पावरा, आदींनी शुभेच्छा दिल्या आहेत.

No comments