adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालयाचा मुलींचा व्हॉलीबॉल संघ जिल्हास्तरावर

 इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालयाचा मुलींचा व्हॉलीबॉल संघ जिल्हास्तरावर  धरणगाव प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) धरणगाव-गो.गं.वाजपेयी ग...

 इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालयाचा मुलींचा व्हॉलीबॉल संघ जिल्हास्तरावर 


धरणगाव प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

धरणगाव-गो.गं.वाजपेयी गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचा १७ वर्षाखालील व १९ वर्षाखालील मुलींचा व्हॉलीबॉल संघ तालुकास्तरिय स्पर्धेत विजयी झाला असून या संघाने जळगाव येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल क्रीडास्पर्धेत धडक मारली आहे

    क्रीडा व युवक सेवा संचलनालय महाराष्ट्र राज्य व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगाव व जिल्हा क्रिडा परिषद जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने,गुड शेफर्ड अकॅडमी धरणगावच्या प्रांगणात रंगलेल्या तालुकास्तरीय व्हॉलीबॉल क्रीडास्पर्धेत सा. दा.कुडे विद्यालय विरुद्ध रंगलेल्या अंतिम सामन्यात १७ वर्षाखालील मुलींच्या संघाने दोन-एक ने पराभव करून ह्या संघाने विजयी घोडदौड कायम ठेवली आहे.तसेच धरणगाव येथील कला, वाणिज्य,विज्ञान महाविद्यालय येथील १९ वर्षाखालील विद्यार्थ्यांना अंतिम सामन्यात हरवत इंदिरा गांधी विद्यालयातील मुलींच्या संघाने २-१ ने पराभव करून जिल्हास्तरावर धडक मारली आहे.

या संघाला प्रशिक्षक म्हणून जेष्ठ क्रीडा शिक्षक डी. एन. पाटील, व फिलीप गावीत यांनी मार्गदर्शन केले. 

 

१७ वर्षा आतील मुलींचा विजयी संघ 

कप्तान देवेश्री ढमाले,गायत्री भदाणे, राधिका भदाणे,दिशा बागुल,ज्ञानदेवी महाजन,रितिषा सोनवणे ,काजल माळी,गायत्री पाटील ,रितू महाजन,राधिका गुरव ,गीतिका वानखेडे,प्राची पाटील खेळाडूनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले.

१९ वर्षाखालील मुलींचा विजयी संघ

कप्तान-योगिता ढमाले, डिंपल चौधरी, रिया सोनवणे, प्रणाली मराठे, अश्विनी चौधरी,राजश्री मराठे, हर्षदा पारधी, शीतल मराठे, कादंबरी धनगर, योगिता मराठे, तनुश्री महाजन, दिव्या चित्ते,

या दोन्हीही संघाने इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचा शिरपेचात पुन्हा एकदा मनाचा तुरा रोवला असून

 या यशाबद्दल विद्यालयाचे चेअरमन डी. जी. पाटील,सचिव सी. के. पाटील,संचालक अश्विन पाटील,संचालक मच्छिंद्र पाटील,संचालक भरत पाटील मुख्याध्यापिका  सुरेखा पाटील,पर्यवेक्षक ए. एस. पाटील व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी मेहनत घेतलेल्या शिक्षकांचे व विजयी संघाचे अभिनंदन केले आहे

No comments