मोठा वाघोदा येथील प्रविण वानखेडे यांची आफ्रिकेतील टांझानिया सामाजिक संशोधन प्रकल्पासाठी निवड. तीन महिन्यांच्या कालावधीत संशोधन! रावेर प्रत...
मोठा वाघोदा येथील प्रविण वानखेडे यांची आफ्रिकेतील टांझानिया सामाजिक संशोधन प्रकल्पासाठी निवड.
तीन महिन्यांच्या कालावधीत संशोधन!
रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
रावेर तालुक्यातील मोठे वाघोदा बुद्रुक गावातील रहिवासी प्रविण कल्पना सुभाष वानखेडे यांची आफ्रिकेतील टांझानिया येथे तीन महिन्यांच्या प्रतिष्ठित सामाजिक संशोधन प्रकल्पासाठी निवड झाली आहे. नोव्हेंबर २०२५ ते फेब्रुवारी २०२६ दरम्यान ते हा प्रकल्प राबविणार आहेत. या यशामुळे गावात आनंदाचे वातावरण आहे.
प्रविण या काळात किनारा फॉर यूथ ऑर्गनायझेशन या आंतरराष्ट्रीय संस्थेसोबत कार्यरत राहतील. तेथील तरुणांच्या लैंगिक आणि प्रजनन आरोग्यावरील संशोधन, तसेच पाणी व स्वच्छतेसाठी नवे उपाय या विषयांवर ते अभ्यास करणार आहेत. या कामामुळे आफ्रिकेतील समाजाच्या आरोग्य व्यवस्थेत सुधारणा होऊन शाश्वत विकासाला चालना मिळणार आहे.
विशेष म्हणजे, या संपूर्ण प्रकल्पाचा खर्च रोटरी इंटरनॅशनल पीस फेलोशिप अंतर्गत रोटरी फाऊंडेशन (अमेरिका) उचलणार आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील ही फेलोशिप मिळणे म्हणजे प्रविण यांच्या मेहनतीची आणि सामाजिक बांधिलकीची मोठी दखल आहे. प्रविण हे दैनंदिन मजुरी करणाऱ्या कुटुंबातील असून त्यांच्या कुटुंबाने प्रचंड कष्ट करून त्यांना शिक्षण दिले आहे. संशोधन पूर्ण करून प्रविण पुन्हा ऑस्ट्रेलियात परततील आणि जून २०२६ पर्यंत आपले मास्टर्स ऑफ पिस ॲन्ड कॉन्फ्लिक्ट स्टडीचे उच्च शिक्षण सुरू ठेवतील. त्यांच्या या यशामुळे गावात आनंदाचे वातावरण आहे.

No comments