शासनाची घरकुलसह अन्य एकाही योजनेपासून लाभार्थी वंचित राहणार नाही याची काळजी घ्यावी -:- आ जावळे यांचे निर्देश रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी...
शासनाची घरकुलसह अन्य एकाही योजनेपासून लाभार्थी वंचित राहणार नाही याची काळजी घ्यावी -:- आ जावळे यांचे निर्देश
रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
रावेर येथे जळगांव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्या उपस्थितीत रावेर येथील मराठा समाज मंगल कार्यालयात जिल्हा परिषद आपल्या दारी' उपक्रमाअंतर्गत सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे व्हावी शासनाच्या घरकुल योजनेतील एकही लाभार्थी घरकुल योजनेपासून वंचित राहू नये प्रत्येकाला आपल्या हक्काचे घर मिळावे या हेतूने शासन घरकुल योजना राबवित आहे एकही लाभार्थी घरकुल योजनेपासून वंचित राहू नये असे स्पष्ट निर्देश रावेर येथे घरकुल तक्रार निवारण बैठकीत रावेरचे आ अमोल जावळे यांनी पंचायत समितीचे संबंधित अधिकारी कर्मचारी यांना दिले
जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकारी मीनल कारनवाल यांच्या संकल्पनेतून आज रावेर येथे रावेर व मुक्ताईनगर मतदार संघांचे आ अमोल जावळे व चंद्रकांत पाटील यांच्या विशेष उपस्थितीत घरकुल योजेच्या माध्यमातून विविध समस्या व त्यावरील निराकारण या साठी बैठकीचे जिल्ह्यात पहिल्यादाच आयोजन मराठा मंगल कार्यालयात आयोजित केले. सदर बैठकीत विविध लाभार्थ्यांनी सुचीत केल्या त्यात घरकुलसाठी जागा, घरकुल मंजूर होऊनही पहिला हप्ता प्राप्त न होणे, घरकुल मंजूर होईनही दुसऱ्या लाभार्त्यांनी लाभ घेणे, रोजगार हमीचे पैसे न मिळणे, अतिक्रमित जागेवर घरकुल उभारने, घरकुल साठी शासकीय जागा मिळवून देण, रमाई व शबरी घरकुल योजनेचे उद्दिस्ट, अशे एक ना अनेक लेखी तक्रारी प्राप्त झाल्यावर बैठकीची सुरुवात वादळी झाली मात्र या सगळ्या तक्रारिंचा मुख्याधिकारी मीनल करणवाल यांनी सांबंधित विभागाचे अधिकारी, व गटविकास अधिकारी तथा ग्रामपंचायत अधिकाऱ्यांशी चर्चा करून योग्य माहिती देत घरकुल लाभार्त्यांना घरकुल योजनेपासून वंचित राहणार नाही या बाबत गटविकास अधिकारी व कर्मचारी यांना मार्गदर्शक सूचना केल्या
असून तालुका स्तरावर त्यांचे पाहिजे तसें निराकरण होत नाही योग्य निराकरण व मार्गदर्शनाचा अभाव या मुळे घरकुलचा लाभ खऱ्या लाभार्थ्या ना मिळत नसल्याने जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकारी मीनल कारणवाल यांनी थेट तालुका स्तरावर घरकुल विषयी तक्रार निवारण बैठक घेऊन ग्रामीण भागातील तळा गाळातील नागरिकांना पर्यंत पोहचत जिल्ह्यात एक आदर्श निर्माण केला असल्याने मुख्याधिकारी मीनल कारणवाल यांचे कौतुक करावे तेवढे कमीच असे बैठकी दरम्यान मुक्ताईनगरचे आ चंद्रकांत पाटील यांनी व्यासपीठावरून आपली भावना व्यक्त केली. सदरील बैठकीत पद्माकर महाजन, प्रल्हाद पाटील, पी के महाजन, रवींद्र महाजन, ऍड सूर्यकांत देशमुख, नितीन पाटील, विनोद तराळ, अरुण शिंदे, छोटू पाटील, विजय महाजन, सी एस पाटील, श्रीकांत महाजन, जितेंद्र पाटील, हरलाल कोळी,राजू लोखंडे. ( प्रकल्प संचालक) हेमंत भदाने. (जिल्हा कार्यक्रम अधिकारी) गटविकास अधिकारी विनोद मेढे नायब तहसीदार संजय तायडे, व्यासपीठावर उपस्तित होते



No comments