adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

लोक अदालतीत नगरपालिकेच्या थकीत वसुलीला चालना– गाळेधारकांचे समाधान

 लोक अदालतीत नगरपालिकेच्या थकीत वसुलीला चालना– गाळेधारकांचे समाधान   चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) चोपडा :-दिवाणी व फौजदारी न...

 लोक अदालतीत नगरपालिकेच्या थकीत वसुलीला चालना– गाळेधारकांचे समाधान  


चोपडा प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

चोपडा :-दिवाणी व फौजदारी न्यायालय, चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने आज दि. 13 सप्टेंबर 2025 रोजी लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले. या लोक अदालतीत चोपडा नगरपरिषदेच्या थकीत रकमेबाबत प्रकरणे तडजोडीद्वारे निकाली काढण्यात आली.आज नगरपालिकेच्या वतीने एकूण 29 दाखल पूर्व प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यातून एकूण ₹37,51,951/- एवढी थकीत रक्कम वसूल करण्यात आली. प्रक्रिया न्यायाधीश शिगोकर यांच्या कोर्टात पूर्ण करण्यात आली. 

या तडजोडी साठी लोक अदालतीत मुख्याधिकारी  राहुल पाटील यांच्या सोबत नगरपालिकेच्या वतीने खालील अधिकारी व कर्मचारी न्यायालयात उपस्थित होते.उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड, मिळकत व्यवस्थापक संजय धमाळ,लिपिक प्रफुल बोंडे, लिपिक पंकज बाविस्कर, ऑपरेटर मुकेश सूर्यवंशी, मदतनिस मनोहर माळी लोक अदालतीच्या यशस्वी आयोजनामुळे थकीत रकमेच्या वसुलीस चालना मिळाली असून नागरिक आणि प्रशासन यांचा समन्वय वृद्धिंगत झाला आहे.

No comments