adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

बीडच्या उपविभागीय पोलीस अधिकारीपदी पूजा पवारांची नियुक्ती... कायदा आणि सुव्यवस्था चोख ठेवणार दिली ग्वाही..!!

 बीडच्या उपविभागीय पोलीस अधिकारीपदी पूजा पवारांची नियुक्ती... कायदा आणि सुव्यवस्था चोख ठेवणार दिली ग्वाही..!!   सौ. कलावती गवळी ( बीड जिल्हा...

 बीडच्या उपविभागीय पोलीस अधिकारीपदी पूजा पवारांची नियुक्ती... कायदा आणि सुव्यवस्था चोख ठेवणार दिली ग्वाही..!!  


सौ. कलावती गवळी ( बीड जिल्हा ) प्रतिनिधी.

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 पूजा विठ्ठल पवार यांची बीडच्या उपविभागीय पोलिस अधिकारी पदी नियुक्ती झाली असून याबाबत गुरुवारी शासनाचे सह सचिव व्यंकटेश भट यांच्या स्वाक्षरीने आदेश काढण्यात आले. असून पूजा पवार यापूर्वीही बीड प्रशिक्षणार्थी (डी वाय एस पी) म्हणून काम पाहत होत्या. गृह विभागाने त्यांना पुन्हा बीडमध्येच जबाबदारी दिली आहे. विश्वांभर गोल्डे हे सेवानिवृत्त झाल्याने हे पद चांगलेच रिक्त होते. त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर आष्टीचे (डी वाय एस पी) हानपुडे पाटील यांच्याकडे अतिरिक्त पदभार सोपवण्यात आला होता. पूजा पवारांनी बीडमध्ये प्रशिक्षणार्थी कर्तव्यदक्षपणे चांगलेच काम केलेले आहे. त्यापैकी बीड शहरांतील दाणेनगर भागातील चालत असलेल्या जुगार क्लबवर धाड मारून लाखोंचा मुद्देमाल हस्तगत केला होता. वडवणी मध्ये वेश्या व्यवसायात चालणाऱ्या लॉजवर धडक कारवाई केली होती. कत्तलं करण्यासाठी जनावरांची वाहतूक करणारे पिकअपचा पाठलाग करून कारवाई केली होती. मटका गुटखावर कारवाया करण्यात आल्या होत्या. त्यामुळेच आता त्यांच्या नियुक्तीने बीड विभागातील पोलीस खात्याच्या कामाला चांगलीच गती मिळणार आहे. विशेष म्हणजे बीड जिल्ह्यातील आत्ताचे वातावरण पाहता एक महिला ( डिवाय एसपी ) अधिकारी दिल्याने नक्कीच महिला वरील अन्याय,अत्याचार गुन्हेगारी व अवैध धंदे कमी होतील असेही बोलले जात आहे. पूजा पवार यांची बीड जिल्हा पोलीस दलात डॅशिंग महिला अधिकारी म्हणून त्यांची चांगलीच ओळख झाली आहे. पूजा पवार या सर्वसामान्य आणि शेतकरी कुटुंबातील आहेत.

No comments