adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

क.जे.सोमैया हायस्कूलमध्ये सायबर सिक्युरिटी विषयक कार्यशाळा संपन्न

 क.जे.सोमैया हायस्कूलमध्ये सायबर सिक्युरिटी विषयक कार्यशाळा संपन्न   श्रीरामपूर / प्रतिनिधी: (संपादक -:- हेमकांत गायकवाड) येथील हिंद सेवा मं...

 क.जे.सोमैया हायस्कूलमध्ये सायबर सिक्युरिटी विषयक कार्यशाळा संपन्न  


श्रीरामपूर / प्रतिनिधी:

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

येथील हिंद सेवा मंडळाच्या क.जे. सोमैया हायस्कूलमध्ये विद्यालयाचे चेअरमन रणजीत श्रीगोड यांच्या मार्गदर्शनाखाली व संजीवनी के.बी.पी पॉलिटेक्निक कोपरगांव येथील इनक्रिप्‍टेड सेक क्लब व लायन्स क्लब, श्रीरामपूर यांच्यावतीने सायबर सिक्युरिटी विषयक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

प्रमुख मार्गदर्शक अथर्व पवार, श्रुती सोनसळे व त्यांचे सहकारी होते. यामध्ये विद्यार्थ्यांना ऑनलाईन व्यवहारात घेण्याची काळजी, पासवर्ड व्यवस्थापन, सिक्युरिटी सॉफ्टवेअर, तसेच सायबर गुन्ह्यांपासून बचावाचे मार्ग समजून सांगण्यात आले.

या कार्यक्रमास लायन्स क्लब श्रीरामपूर चे अध्यक्ष राहुल अरबट्टी, विशाल पवार, प्रशासकिय अधिकारी बी.एस.कांबळे, विद्यालयाचे मुख्याध्यापक भूषण गोपाळे, पर्यवेक्षक कल्याण लकडे, रमेश धोंडलकर, अनिल चोभे, संतोष सोले, श्रीराम कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी विद्यालयातील सर्व अध्यापक व सेवकवृंद प्रयत्नशील होते.


वृत्त प्रसिद्धी सहयोग

समता मीडिया सर्व्हिसेस

 श्रीरामपूर - 9561174111

No comments